राजकीय

शिरसी-वाणीचिंचाळे-पारे ते जत तालुका हद्द या रस्त्यासाठी १७७ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर – आम.शहाजीबापू पाटील

सांगोला :

मंगळवेढा-सांगोला ते सांगली जिल्हा हद्दीतील जत तालुक्याला जोडणारा मंगळवेढा-पारे-जत रस्ता (राज्यमार्ग क्र.१५६ मधील सांगोला तालुक्यातील कि.मी.२२/६०० ते ४४/८०० अशा एकूण २२/२०० कि.मी.लांबीच्या) या रस्त्याच्या कामासाठी चालू नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यातून १७७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगळवारी नागपूर येथून दिली.

शिरसी (ता.मंगळवेढा)-वाणीचिंचाळे- घेरडी-पारे ते जत रस्ता (राज्यमार्ग क्र.१५६) या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळविण्यासाठी मागील ४ वर्षापासून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.आमदार शहाजीबापूंच्या या मागणीला हिरवा कंदील दाखवत राज्याचे मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री नाम.रविंद्र चव्हाण यांना चालू अधिवेशनामध्ये या रस्त्याच्या कामाला आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यित प्रकल्पांमध्ये समाविष्ट करुन मंजूरी देण्याचे आदेश दिल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्याला चांगलेच यश मिळाले असून या कामासाठी ७० टक्के निधी आशियाई विकास बँकेकडून तर ३० टक्के निधी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणार आहे.

            मागील चार वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व लवकरात लवकर या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामास सुरुवात करुन गुणवत्तापूर्वक काम पूर्ण करण्याचा मानस आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
——————————————————————————

६ बस थांबे,छोटे पूल व स्वच्छता गृहासह असा असेल रस्ता :

        सोलापूर व सांगली या २ जिल्ह्याला जोडणारा हा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता असून २२/२०० कि.मी.लांबीचा हा रस्ता १० मीटर रुंदीने डांबरीकरण होणार असून सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे व घेरडी गावांतर्गत काँक्रीटचा रस्ता होणार आहे.यामध्ये ६ ठिकाणी बस थांबे,छोटे पूल व स्वच्छतागृह यासह अनेक सोईसुविधा असणार आहेत.लवकरच या कामाच्या विस्तृत अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करुन रस्त्याचे काम त्वरित सुरु करणार.                        – आमदार शहाजीबापू पाटील
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button