महत्वाच्या बातम्या

डिजिटल मिडिया संपादक-पत्रकार संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी सचिन कुलकर्णी

पंढरपूर :

प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रमाणेच डिजिटल मिडियात काम करणाऱ्या संपादक व पत्रकारांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी डिजिटल मीडिया ही संघटना काम करत असून डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वात संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुनील उंबरे तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व उपाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली यामध्ये डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी सचिन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.तर, उपाध्यक्षपदी विजय कांबळे व गणेश महामुनी यांची निवड करण्यात आली.

त्याचबरोबर,ज्येष्ठ पत्रकार राजकुमार शहापूरकर व नागेश सुतार हे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहणार असून कार्याध्यक्षपदी सचिन झाडे,सचिवपदी अपराजित सर्वगोड, सहसचिवपदी अश्पाक तांबोळी,खजिनदारपदी दगडू कांबळे तर,सहखजिनदारपदी राम अभंगराव यांची निवड करण्यात आली.तसेच प्रसिद्धीप्रमुखपदी सोहन जैस्वाल, संपर्कप्रमुखपदी नागेश काळे यांची निवड करण्यात येवून कबीर देवकुळे,सूर्याजी भोसले,मंदार मंगसुळकर,हुसेन मुलाणी,राजेंद्र काळे,अजिंक्य इंदापूरकर,रवी सोनार,संतोष चव्हाण,लखन साळुंखे आदींची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

या सर्वांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील उंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सतीश सावंत,उपाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.सदर निवडीनंतर नुतन शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी म्हणाले की, “पत्रकारितेत काळानुरुप स्थित्यंतरे होत आली आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरत असून त्याचे महत्व दुर्लक्षित करुन चालणार नाही. त्यामुळे डिजिटल मीडियाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणार”, असल्याचे सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button