सांगोला :
म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सांगोला शहरातील डॉ.अजिंक्य गिरीश नष्टे यांच्या अजिंक्यतारा मल्टीकेअर हॉस्पिटलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सांगोला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान व राणोजी मंदिर येथे दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत जगताप सर यांचे मार्गदर्शनाखाली चैतन्य हास्य योग मंडळ चालविले जात असून या योग मंडळाचे सर्व सदस्य हे ज्येष्ठ नागरिक असल्याने या सर्व सदस्यांचे ब्लड शुगर,ब्लड प्रेशर,इ.सी.जी.आदींची मोफत आरोग्य तपासणी अजिंक्यतारा मल्टीकेअर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आली.तपासणी नंतर डॉ.अजिंक्य नष्टे यांनी पुढील औषधोपचाराबाबत योग्य तो सल्ला दिला.
प्रारंभी,उद्योगपती गिरीशभाऊ नष्टे यांनी सर्वांचे स्वागत करुन हॉस्पिटलमधील उपलब्ध सुविधांची माहिती करुन दिली.हॉस्पिटलमध्ये आय.सी.यू, एक्स रे, इंडोस्कोपी इ.अद्यावत सुविधा उपलब्ध असल्याची माहिती डॉ.अजिंक्य नष्टे यांनी दिली.
सदर तपासणीसाठी मंडळाचे अध्यक्ष जगताप सर, ह.भ.प.बाळासाहेब तेली,हेमंत तेली,जयंत तेली,डॉ. कृष्णा इंगोले,प्रा.उत्तमराव घाटूळे,प्रा.राजेंद्र ठोंबरे, सुभाष महिमकर,मिलिंद पतंगे,प्रकाश होनराव,म.शं. घोंगडे सर,सोमनाथ ढोले गुरुजी,भागवत पैलवान गुरुजी इ.उपस्थित होते.या वेळी मंडळातर्फे पैलवान गुरुजी यांनी डॉ.अजिंक्य नष्टे व हाॅस्पीटल मधील स्टाफचे आभार मानले.
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर