सांगोला रोटरी क्लबच्या वतीने दिव्यांगांसाठी शिबीर संपन्न

 

सांगोला :

रोटरी क्लब ऑफ,सांगोला व रत्ननिधी फाउंडेशन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला परिसरातील दिव्यांगांना कृत्रिम हात,कृत्रिम पाय, कुबड्या देणे व पोलिओ झालेल्यांना पायाला क्लापर्स बसविणे यासाठी मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल,सांगोला येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात सुमारे ४५ दिव्यांगांना कृत्रिम हात,पाय व कुबड्या देण्याचे नियोजन करण्यात आले.

सदर शिबीरामध्ये सांगोला रोटरी क्लबच्या मदतीने सांगोला, जत,मंगळवेढा,आटपाडी,विटा,कवठेमहांकाळ व सांगली या भागातून दिव्यांग लोक आले होते. शिबिरात एकूण ५९ दिव्यांगांनी हजेरी लावली. त्यापैकी, ४५ दिव्यांगांच्या अवयवाचे माप घेऊन त्यांना आवश्यक ते कृत्रीम अवयव दिले जाणार असून बाकी दिव्यांगाना वैद्यकीय दृष्ट्या अडचणी असल्यामुळे अवयव देता आले नाहीत.सदर शिबीरात दिव्यांगांच्या अवयवांची मापे घेण्यासाठी रत्ननिधी फाउंडेशन कडून डॉक्टरांची टीम आली आणि त्यांचेही या कामासाठी चांगले सहकार्य लाभले.तसेच या टीमसह या प्रकल्पाचे जिल्हाप्रमुख रो.सी.ए. नितीन कुदळे हेही या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.

दिव्यांगांची सोय व्हावी म्हणून रोटरी क्लबच्या वतीने एस.टी.स्टँड पासून जवळ अंतरावर असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल,सांगोला येथे या शिबिराची व्यवस्था करण्यात आली होती.येत्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत सर्व दिव्यांगांना अवयव मिळून त्यांचे आयुष्य सुखकर होईल. न्यू इंग्लिश स्कूलचे पदाधिकारी व शिक्षकांनीही या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य दिले. विशेषतः प्राचार्य हेमंत आदलिंगे,प्रा.संजय शिंगाडे, रो.दत्तात्रय पांचाळ यांनी विशेष सहकार्य केले.

                             सदर कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ.साजिकराव पाटील,डॉ.प्रभाकर माळी,डॉ. सोनलकर,डॉ.पिसे,रो.इंजि.मधुकर कांबळे,रो.दीपक चोथे,रो.हमीदभाई शेख,रो.विशाल बेले,रो.सचिन पाटकुलकर,रो.विकास देशपांडे,रो.सुरेश माळी,रो. अशोक नवले,रो.शरणाप्पा हळळीसागर,रो.डोंबे
गुरुजी,रो.महेश गवळी,रो.विजय म्हेत्रे,रो.अशोक गोडसे,रो.श्रीपती आदलिंगे,रो.बशीरभाई तांबोळी, रो.ज्ञानेश्वर कमले या सर्वांनी चांगली मेहनत घेतली, त्यामुळे हा दिव्यांगांना अवयव देण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
—————————————————————————