सांगोला :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांचेसह टेंभू अधिकार्यांसोबत झालेल्या टेंभू योजनेच्या पाणी वाटपाच्या फेरनियोजन बैठकीत सांगोला तालुक्याला अतिरिक्त २ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु असून टेंभू योजनेच्या पाणी वाटपाच्या फेरनियोजन बैठकीत सांगोला तालुक्याला अतिरिक्त २ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे.यामधून बलवडी,य.मंगेवाडी,वझरे,नाझरे,चिणके, सोनलवाडी,बागलवाडी,अजनाळे,हणमंतगाव, मानेगाव, डोंगरगाव,हटकर मंगेवाडी आदी वंचित राहिलेल्या अन्य गावांना यामधून पाणी मिळणार आहे,अशी माहीती आम. शहाजीबापू पाटील यांनी दिली.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,सांगोला तालुक्याचा वर्षानुवर्षाचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी टेंभू,म्हैसाळ,नीरा उजवा कालवा,उजनीचे २ टीएमसी पाणी या सर्व सिंचन प्रकल्पातून पाणी सोडून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी खास.रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच मी स्वतः कटिबद्ध आहोत.खास.रणजितसिंह निंबाळकर आणि मी असे आम्ही दोघांनी मिळून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून २०१९ पासून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. खास.निंबाळकर व मी नीरा उजवा कालव्याचे पाणी टेल टू हेड पद्धतीने सोडण्याचे आदेश दिल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या फेरनियोजन पाणी वाटपाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,खास.रणजितसिंह नाईक-निंबाळकर,आमदार शहाजीबापू पाटील आणि टेंभूचे अधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली.यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी टेंभूच्या फेर पाणी वाटपाच्या नियोजनात महामंडळाने सादर केलेल्या प्रकल्पाच्या सुधारित फेरपाणी वाटपाचा आराखडा सादर करण्यात आला. या फेरनियोजन बैठकीत सांगोला तालुक्याला टेंभू योजनेतून अतिरिक्त २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मंजूर झाला आहे. तसेच टेंभू योजनेतून माण नदीवरील बंधारे भरून देणार असल्याची माहितीही आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी दिली. टेंभू योजनेचे पाणी वाटपाचे फेरनियोजनानंतर सांगोला तालुक्याला अतिरिक्त २ टीएमसी पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवून तालुक्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आणून शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक प्रगती साधण्यासाठी खास. रणजितसिंह निंबाळकर व मी स्वतः प्रयत्नशील असल्याचे आम.शहाजीबापू पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
————————————————
* खा.निंबाळकर व शहाजीबापू यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळला :
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार रणजीतसिंह निंबाळकर व आमदार शहाजीबापू पाटील यांनी २०२४ च्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न राहणार नाही,असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानुसार गेल्या चार वर्षात खासदार रणजीतसिंह निंबाळकर व आम.शहाजीबापू पाटील यांनी टेंभू,म्हैसाळ,निरा उजवा कालवा तसेच उजनीचे २ टीएमसी पाणी या सर्व सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या सर्व सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्याला पाणी सोडण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला असून २०१९ च्या निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करुन खा.रणजितसिंह निंबाळकर व आम. शहाजीबापू पाटील यांनी शब्द पाळला आहे.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक