राजकीय

भाजपा किसान मोर्चाच्या प.महाराष्ट्र उपाध्यक्षपदी शशिकांतभाऊ देशमुख यांची नियुक्ती

 

सांगोला :

सांगोला तालुक्यातील जवळ्याचे मुंबईस्थित सुपूत्र शशिकांतभाऊ देशमुख यांची भारतीय जनता पार्टी, “किसान मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी” नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी नुकतेच दिले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही समर्थपणे वाटचाल करित असून शेतकरी व शेतमजूरांसाठी अहोरात्र झटणारा भाजपाअंतर्गत किसान मोर्चा हा राष्ट्रीय अध्यक्ष खा.राजकुमार चाहर यांचे कुशल नेतृत्वाखाली यशस्वीपणे मार्गक्रमण करित आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच किसान मोर्चाचे प्रभारी तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आम.रणधीर सावरकर आणि किसान मोर्चाचे प्रभारी ज्ञानोबा मुंडे यांच्या संमतीने किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली असून त्यामध्ये किसान मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी शशिकांतभाऊ देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किसान मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल शशिकांतभाऊ देशमुख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
————————————————

शेतकरी व शेतमजूरांच्या अडीअडचणी सोडविणार :

                                   शेतकरी व शेतमजूर हे अनेक समस्यांना व अडीअचणींना तोंड देत असून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून त्यांना न्याय व दिलासा मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणार आहे.
                   – नुतन उपाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button