सांगोला :
सांगोला येथील केदार हॉस्पिटल येथे दि.१ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान मोफत मूत्ररोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबीर पंधरवडा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ.अण्णासो लवटे व डॉ.निरंजन केदार यांनी दिली.
मिरज-सांगली मधील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ.चेतन शहा यांच्या सहकार्याने दि.१ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.सदर शिबिरामध्ये मूत्ररोग,मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीची सूज,मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार, किडनीवरील सूज,किडनीतील खडे,मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधितील आजार-लघवी वारंवार होणे,स्त्री व पुरुष यांच्या लघवीच्या मार्गातील अडथळे, लघवीच्या मार्गामध्ये पडदे तयार होणे,लघवी न होणे इ.आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.
गरजू रुग्णांनी या शिबिरासाठी येताना जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे व मोफत उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोरगरीब आणि गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.अण्णासो लवटे व फिजिशियन डॉ.निरंजन केदार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.ज्या रुग्णांना मूत्ररोग संबंधातील शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे, त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया ही केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यांच्या माध्यमातून मूत्ररोग तज्ञ डॉ.चेतन शहा यांचेमार्फत दुर्बिणीद्वारे आणि लेझरद्वारे मोफत करण्यात येणार आहे.सांगोला,मंगळवेढा, आटपाडी,जत,पंढरपूर तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा.
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर