सांगोला :
सांगोला येथील महसूल विभाग व दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल विभागातील कर्मचार्यांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर शिबिराचे उदघाटन तहसीलदार संजय खडतरे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वैद्यक क्षेत्राची देवता धन्वंतरीची पूजा करून करण्यात आले.
सदर आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार संजय खडतरे यांचेसह सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी,तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड व नामवंत शल्य चिकित्सक डॉ.अमर शेंडे,डॉ.मच्छिंद्र सोनलकर,डॉ. शिवराज भोसले,तानाजीकाका पाटील,इंजि.रमेश जाधव,अरविंद केदार,पिंटू पाटील,संजय नवले,डॉ. सुशांत बनसोडे,डॉ.सुदीप चव्हाण,डॉ.अण्णासो लवटे, डॉ.संतोष शिंदे,डॉ.धनाजी जगताप,डॉ.निरंजन केदार, डॉ.महादेव जगताप,पत्रकार जगदीश कुलकर्णी, कॉन्ट्रॅक्टर खंदारे,महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे आरोग्य मित्र सुभाष बनसोडे,आसिफ पठाण,चंद्रभागा नेत्रालयचे सर्व स्टाफ,दक्षता हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स,मेडिकल ऑफिसर व सर्व नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते.

यासमयी,तहसीलदार संजय खडतरे यांचे वाढदिवसानिमीत्त हॉस्पिटलच्या वतीने व विविध मान्यवरांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला. तहसीलदार खडतरे यांनी याप्रसंगी बोलताना,महसूल कर्मचारी यांना कामाचा ताणतणाव,यामुळे होणार्या आरोग्य संबंधीच्या समस्या व आजार हे टाळण्यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजेत ? यावर मार्गदर्शन केले आणि शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया व उपचार केल्याबद्दल दक्षता हॉस्पिटलचे विशेष कौतुक केले.डॉ.अमर शेंडे यांनी यावेळी बोलताना,कोविड काळात सांगोला तालुक्याचे तहसीलदार, महसूल कर्मचारी व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांनी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले आणि कोविड काळातील वैद्यकिय क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला.तसेच महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना, शासकीय आरोग्य योजना,मोफत आरोग्य तपासणी शिबिरे ही सर्व सामान्य जनतेपर्यंत आणखी प्रभावीपणे कशा पद्धतीने पोहोचवता येईल ? यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी,सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार दक्षता हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले. सदर शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील महसूल विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी,तलाठी व तहसिल कार्यालयातील सर्व स्टाफ यांची मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली.सदर शिबिराचा सुमारे ९६ कर्मचारी पेशंट यांनी लाभ घेतला असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हॉस्पिटल चे पी.आर.ओ.महावीर गोरे यांनी केले तर,आभार डॉ.संतोष शिंदे यांनी मानले. तसेच सूत्रसंचालन डॉ.निरंजन केदार यांनी केले.
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर