महत्वाच्या बातम्या

महिलांवरील अन्याय,अत्याचार रोखण्यासाठी आम्ही फक्त आजचा दिवसच नव्हे तर,वर्षभरातील संपूर्ण ३६५ दिवस कायम तत्पर असतो – पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी

सांगोला :

          शिक्षण घेत असताना विद्यार्थिनींनी आपले ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही चुकीच्या प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे कष्ट करुनच यश मिळवले पाहिजे. कायदा व सुव्यवस्था ही तुमच्या हितासाठीच आहे,त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. परंतु,यासाठी तुमच्याही दक्षतेची व सहकार्याची आम्हाला अपेक्षा असते. तुमचा आमच्यावरील विश्वास कायम राखणे,चांगल्याचे रक्षण करणे व वाईटाचा अंत करणे,हेच आमचे मुख्य ध्येय असून महिलांना सुरक्षितता देण्यासाठी व महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी आम्ही फक्त आजचा दिवसच नव्हे तर,वर्षभरातील सर्व ३६५ दिवस कायम तत्पर असतो,असे विचार सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शनपर बोलताना व्यक्त केले.

                   सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला संचलित,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शैक्षणिक संकुलामधील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सांगोला पोलीस स्टेशन व एस.टी. महामंडळाच्या आगारात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे बोलत होते. यासमयी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे,पोलीस उपनिरीक्षक उबाळे मॅडम व इतर पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते.

एस.टी.महामंडळाकडून मुलींना मिळत असलेल्या सवलती तसेच सुरक्षिततेबाबत त्यांचेकडून होत असलेल्या सहकार्याची जाणीव ठेवून आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगोला येथील एस.टी.बस आगारातही हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आगार व्यवस्थापक नदाफ म्हणाले की, तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे,तो निश्चितपणे कोणतीही अडचण न येता व कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता तुम्हाला पूर्णपणे सहकार्याची भूमिका नेहमी राहील,असे सांगीतले.

यावेळी,आगार व्यवस्थापक नदाफ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक काशीद साहेब,वाहतूक नियंत्रक बळवंत जाधव, सुरक्षारक्षक गायकवाड तसेच इतर एस.टी.कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.

वरील दोन्ही कार्यक्रमांदरम्यान प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा. संतोष राजगुरु यांनी केले.तर,आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.कामिनी वाघमारे व कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.जुलेखा मुलाणी यांनी मानले. सदर
कार्यक्रमासाठी प्राचार्य आदलिंगे सर,उपप्राचार्य माने सर,पर्यवेक्षक शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी प्रा.संतोष राजगुरु, कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ.सुनीता लिगाडे,प्रा.सौ.जुलेखा मुलाणी,प्रा.सौ. कामिनी वाघमारे,प्रा.सौ.सुवर्णा काशीद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button