सांगोला :
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते,माजी मंत्री स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त डाॅ.गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनियर कॉलेज,सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने १० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता १० किलोमीटर धावणे या राज्यस्तरीय “श्रमिक मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा पुरुष खुल्या गटासाठी असून पहिल्या ६ क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंना रोख रुपये अनुक्रमे ७ हजार,५ हजार,४ हजार,३ हजार,२ हजार व १ हजार रुपये रोख तसेच ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.सदरच्या मॅरेथॉन स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रा.विजय पवार, प्रा.अरुण बेहरे,प्रा.कामाजी नायकुडे, प्रा.हिम्मत साळुंखे,प्रा.हजारे,प्रा.डॉ.जगन्नाथराव ठोंबरे, प्रा.संतोष लवटे, प्रा.तानाजी गावडे,प्रा.डॉ.काकासाहेब घाडगे व इतर अनेक सहकारी परिश्रम घेत आहेत.
तरी, या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी व न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे यांनी केले आहे.
——————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न