आरोग्य

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्व.आबासाहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत मुत्ररोग निदान व उपचार शिबीर

 

सांगोला :

सांगोला शहरातील दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला,आटपाडी,मंगळवेढा,जत,पंढरपूर या तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या दरम्यान मोफत मूत्ररोग निदान व उपचार शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सांगोला येथील दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मिरज-सांगली येथील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ.चेतन शहा यांच्या सहकार्याने मंगळवार दि.१ ऑगस्ट ते गुरुवार दि.१० ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात मूत्ररोग,मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज,मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार, किडनीतील खडे,मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधी आजार इ.आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.या शिबिरासाठी रुग्णांनी आपले जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे.ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे,अशा (केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना) रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया ही महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना यांच्यामार्फत मोफत करण्यात येणार आहे.

तरी,या मोफत मूत्ररोग उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोर-गरीब गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन दक्षता हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले असून सांगोला,मंगळवेढा,जत,आटपाडी व पंढरपूर तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांनी संपर्क साधून सदर शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.अण्णासो लवटे व डॉ.निरंजन केदार यांनी केले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button