सांगोला विधानसभा मतदारसंघातील दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटीचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला : 

ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी व या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील ४३ कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आम.शहाजीबापू पाटील यांनी दिली.

या निधीमधून विविध गावातील दलित वस्ती अंतर्गत रस्ते करणे,सामाजिक सभागृह बांधणे,विविध ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवणे,सभा मंडप बांधणे,आंबेडकर भवन बांधणे, बैठक व्यवस्था तयार करणे,सुशोभीकरण करणे,पत्रा शेड मारणे,बहुउद्देशीय सभागृह बांधकाम करणे,स्मशानभूमी सुधारणा करणे,दलित वस्तीमध्ये गटारी तयार करणे आदी कामे केली जाणार असून वंचित असणाऱ्या दलित वस्त्यांचा सर्वांगीण मूलभूत विकास होणार असल्याने दलित बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे.सदर कामांची अंदाजपत्रके तात्काळ तयार करुन व निविदा प्रक्रिया करुन कामे वेळेत व दर्जेदार करण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
—————————————————————————