सांगोला :
माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व गटनेते आनंदा माने यांनी मुजावर गल्लीतील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत १० वी च्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
दहावीच्या परीक्षेमध्ये मुजावर परिवारातील शाहीद जमीर मुजावर,जिया तौफिक मुजावर,आलिशा जाकीर मुजावर,यास्मिन जावेद मुजावर या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चांगले यश मिळविल्याबद्दल त्यांचा
माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व गटनेते आनंदा माने यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा राणीताई माने यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी,आयोजक रऊफ मुजावर यांनीही मार्गदर्शन केले. या सत्कार सोहळ्यासाठी फिरोजभाई खतीब,ज्येष्ठ मार्गदर्शक इलाही मुजावर,अंबिर मुजावर,इन्नूस मुजावर,तौफिक मुजावर,कय्युम मुजावर सर,झाकीर मुजावर,साहिल खतीब यांच्यासह विद्यार्थी,पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न