सांगोला :
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची (PMFME) सांगोला नगरपरिषदेकडून प्रभावी अंमलबजावणी केली जात असून सांगोला शहरातील युवक,शेतकरी,शेतकरी कंपन्या,उत्पादन संस्था व स्वयंसहाय्यता गटांना या योजनेद्वारे प्रक्रिया उद्योग सुरु करता येतो.या माध्यमातून शेतमालाला चांगला भाव मिळू शकेल आणि शासकीय अनुदानही मिळेल.त्यामुळे सांगोला नगरपरिषद हद्दीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेणेसाठी शहर अभियान व्यवस्थापन कक्ष (NULM) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केलेले असून सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी ही योजना राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी,स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पत मर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे,अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे,सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग,विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे,अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यावर भर देणे तसेच सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक साहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे, हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत.
सांगोला नगरपरिषद हद्दीतील या योजने अंतर्गत पोर्टलवर प्राप्त झालेले प्रकल्प/प्रकरणे बँकेला सादर करण्यात आली असून बँकेव्दारे कर्ज वितरण होवून पापड तयार करणे, शेवाळ्या तयार करणे,अशा विविध प्रक्रियांवर आधारित उत्पादने घेण्यास लाभार्थ्यांनी सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३३ लाख ६४ हजार रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून लाभार्थ्यांना PMFME योजने अंतर्गत त्यापैकी रुपये १३ लाख ३८ हजार इतक्या रकमेचे धनादेश तहसीलदार तथा सांगोला नगर परिषदेचे प्रशासक संजय खडतरे व मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचे हस्ते वितरित करण्यात आले.यावेळी, लोकमंगल बँकेचे मॅनेजर प्रविण भोसले,अँड.गजानन भाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.यामध्ये बँक ऑफ इंडिया,युनियन बँक ऑफ इंडिया,लोकमंगल को-ऑप. बँक,सांगोला यांचेकडून विशेष सहकार्य मिळाले. ———————————————————————–
* या योजनेअंतर्गत कोणास मिळेल लाभ ?
१) या योजने अंतर्गत १८ वर्षांवरील वैयक्तिक मालकी/भागीदारी,शेतकरी उत्पादक गट संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला,प्रगतशील शेतकरी यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखापर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ देय आहे.
२) सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन/शासकीय संस्था याही भाग घेवू शकतात.सदर घटकांसाठी ३ कोटी कमाल मर्यादेसह पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के क्रेडीट लिंक कॅपिटल सबसिडी देय आहे.
३) बचत गटातील सदस्यांना बीज भांडवल अंतर्गत खेळते भांडवल किंवा गुंतवणीकरीता रक्कम रु.४००,०००/- प्रति सदस्य (प्रति बचत गटास रु.४ लाख ) देय आहे.—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने