शैक्षणिक

मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे

डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

 

सांगोला :

आपण कितीही मोठे झालो तरी,आई-वडील व गुरुना कधीही विसरायचे नाही,असे सांगत जीवन जगत असताना मरायला हिंमत लागत नाही तर,जगायला खूप हिंमत लागते,असे विचार सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे यांनी व्यक्त केले.

सांगोला येथील डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे या बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या ‘फिंद्री’ या सुप्रसिद्ध कादंबरीबद्दल सविस्तर माहिती सांगितली.’फिंद्री’ म्हणजे नको असलेली मुलगी,जीवन जगत असताना कसा संघर्ष करते ? व जीवनात कशी यशस्वी होते ? याचे खूप सुंदर वर्णन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेत(भैय्या) देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की,तरुणांनी शिक्षण घेऊन आई,वडिलांची व समाजाची सेवा करावी.आपल्या महाविद्यालयात २०२६-२७ पासून बी.एस्सी (ए.आय) चे शिक्षण चालू होणार आहे. त्यामुळे मुलांनी सदर कोर्सची निवड करुन आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर करावा,असेही यावेळी त्यांनी सांगितले.

जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी यांनी केले.तर,प्रमुख पाहुण्यांची ओळख मराठी विभागाचे प्रा.किसन पवार यांनी करुन दिली.त्यानंतर, महाविद्यालयाचे अहवाल वाचन ‘जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ’ कमिटीचे चेअरमन प्रा.अशोक कांबळे यांनी केले.अहवाल वाचनानंतर प्रमुख मान्यवरांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर,गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यामध्ये प्रा.कोकरे बी.डी.,प्रा.डॉ.सौ.सीमा गायकवाड, प्रा.डॉ.राजेंद्र सूर्यवंशी,प्रा.अक्षय माने,प्रा.डॉ.किसन माने या प्रमुख गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला होता,त्या प्रमुख स्पर्धांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

              बौद्धिक स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.रुपनर पी.जे.यांनी व मैदानी स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे सूत्रसंचलन प्रा.पवार व्ही.एम.यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे सर,संस्थेचे संचालक अवधूत कुमठेकर मालक,न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेजचे प्राचार्य केशव माने,प्रा.संतोष खडसे व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.किसन पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.सौ.सिमा गायकवाड, प्रा.डॉ.मनोजकुमार माने व प्रा.शेख एन.एस.यांनी केले.    ===================================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button