राजकीय

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी अ‍ॅड.गजानन भाकरे यांची निवड

 

सांगोला :

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी माजी नगरसेवक अ‍ॅड.गजानन लक्ष्मण भाकरे यांची निवड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली. त्यानिमित्त माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत कुटुंबीयांच्या वतीने राज्याचे माजी सहकार मंत्री आम.सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते अ‍ॅड.गजानन भाकरे यांचा फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

माजी नगरसेवक अ‍ॅड.गजानन भाकरे हे माजी मंत्री तथा आम.सुभाषबापू देशमुख यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणून व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. माजी नगरसेवक अ‍ॅड.गजानन भाकरे यांच्या या निवडीनिमित्त आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत, हाजी हमीद तय्यब खतीब,प्राचार्य सर्फराज खतीब,अ‍ॅड. धनंजय लिगाडे,धनाजी महांकाळ यांच्यासह इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button