सांगोला :
महिला कर्मचारी,ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला व स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे आणि नवजात बालकांच्या कुपोषण मुक्तीसाठी राज्य सरकारने २०१२ मध्ये एसटी बसस्थानकांसह सरकारी कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला होता. स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, याकरिता कामकाजी महिलांसाठी ६० बाय ६० च्या स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण २०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारने जाहीर केले. हिरकणी कक्ष ही संकल्पना अगदी चांगली असून हिरकणी कक्षाचा वापर योग्य त्या कारणासाठीच व्हावा व बांधकामाचे नियोजनही योग्यप्रकारे व्हावे,पाण्याची सोय व्यवस्थित असावी व हिरकणी कक्ष हा नियोजनबध्द आणि सर्व सोई-सुविधांनी युक्त अशा पद्धतीने बांधलेला असावा, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दिलीप स्वामी यांनी सांगोला येथे केले.
एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच हिरकणी कक्ष सांगोला पंचायत समितीच्या आवारात उभा करण्याचा निर्णय घेऊन मंगळवारी २५ एप्रील रोजी दुपारी दोन वाजता सांगोला तालुक्यातील हिरकणी कक्षाचे भूमिपूजन सीईओ दिलीप स्वामी यांचेसह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सहा.गटविकास अधिकारी विकास काळुंखे,ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता सुरेश कमळे,जि.प.सार्व. बांधकाम विभागाचे उपअभियंता बाळासाहेब नकाते,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आतार मॅडम आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सीईओ दिलीप स्वामी हे बोलत होते.
याप्रसंगी सांगोला पंचायत समितीचे सर्व अधिकारी,एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे सर्व अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे सर्व शाखा अभियंता, जि.प.बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर