सांगोला :
भगवान परशुराम यांच्या जयंती निमीत्त समाजातील पुरस्कारप्राप्त व विवीध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करुन समाजाची उंची वाढविणार्या अनेक मान्यवरांचा सन्मान तसेच वक्तृत्व स्पर्धा,रंगभरण स्पर्धा,महाप्रसाद व मार्गदर्शनपर विचारांची मैफील अशा भरगच्च कार्यक्रमांनी सांगोला येथील श्रीदत्त मंदीरात भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात सांगोला पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अनंतराव कुलकर्णी यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्त प्राध्यापक भगवंतराव कुलकर्णी यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच अखंड जीवन आध्यात्मिक क्षेत्रातच व्यतित केल्या बद्दल वेदशास्त्रसंपन्न दत्तदेव (दत्तोपंत) वांगीकर यांचा ह.भ.प.सुभाष लऊळकर सर यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर,तालुक्यात प्रथमच स्वरुप देशपांडे यांनी भागवत संस्कृत संहिता अभ्यास पुर्ण केल्याबद्दल,राजुदादा कुलकर्णी यांची लोकमंगल को-आँप.बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल,कु.श्रेया कुलकर्णी हिने सांगोला तालुक्यात प्रथमच तबला वादन “अलंकार” ही पदवी प्राप्त केल्याबद्दल परशुराम युवक संघटनेच्या वतीने या सर्वांचाही सत्कार यासमयी करण्यात आला. यावेळी, अमोल कुलकर्णी (पत्रकार, खर्डी) यांनी सर्व समाज बांधवांना व उपस्थित परशुराम प्रेमींना मार्गदर्शन करुन आपले विचार व्यक्त केले. परशुराम जन्मोत्सवानिमित्त लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा तसेच रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर आयोजित केलेल्या महाप्रसादाचा सुमारे ३०० भक्तांनी लाभ घेतला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोलदादा लऊळकर यांनी तर,स्वागत अश्विनी कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद वांगीकर यांनी केले आणि आभार पत्रकार नागेश जोशी यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी परशुराम संघटनेचे सर्व कार्यकर्ते व परशुराम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर कुलकर्णी,श्रीकांत हसबनीस,संजय हसबनीस, मंगेश कुलकर्णी, रविंद्र कुलकर्णी,ओंकार कुलकर्णी, सौ.अनिता बेले,स्नेहल लऊळकर,वैष्णवी लऊळकर, श्रद्धा देशपांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने