सांगोला ईदगाह मैदानावरील रमजान ईदची नमाज वाढत्या उष्णतेमुळे सकाळी लवकर होणार – हाजी शब्बीरभाई खतीब

 

सांगोला :

                     आपल्या अल्लाहला राजी करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कडक उकाड्यातही रमजानचे पवित्र रोजे,नमाज,तराबीह व तहाजूदची नमाज अदा करुन तसेच जकात व फितरा यांचे वाटप करुन मुस्लीम समाज आता,ईदची नमाज अदा करण्यासाठी सज्ज झाला असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सांगोला शहरातील ईदगाह मैदानावरील रमजान ईदची नमाज ही सकाळी लवकर ९ वाजण्याचे सुमारास पठण केली जाणार असल्याची माहिती अलहाज  शब्बीरभाई खतीब यांनी दिली.

रमजान ईदची नमाज ही दरवर्षी सकाळी ९.३० वाजता पठण केली जात होती. पण सध्या, मागील आठवड्याभरापासून तापमान सुमारे ४० अंशापेक्षाही जास्तच असल्याने नमाज पठणसाठी येणार्‍या वृध्द बांधवांना उन्हाचा त्रास होवू नये,या उद्देशाने ईदची नमाज अर्धा तास अगोदर म्हणजेच ९ वा.सुरु करण्यात येईल तसेच नमाज नंतर दिला जाणारा खुतबाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे हाजी शब्बीरभाई खतीब यांनी सांगितले.

————————————————
मुस्लीम बांधवांनी उन्हापासून काळजी घ्यावी :

                  राज्यातील विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढच होत असून कांही ठिकाणी तापमानाचा पारा हा ४०-४१ अंशाच्या आसपास गेला आहे. या उष्णतेचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून घरातून बाहेर पडताना थोडेसे गोड खावून निघावे आणि सोबत पाण्याची बोटलही आणावी तसेच मुस्लीम बांधवांनी उन्हापासून स्वतःची काळजी घ्यावी.
                                         – हाजी शब्बीरभाई खतीब
—————————————————————————