राजकीय

हतीदच्या सरपंचपदी शिंदेसेनेच्या संगीता घाडगे यांची बिनविरोध निवड

हतीद ग्रामपंचायतीवर शिवसेना आ.शहाजीबापू पाटील यांचे वर्चस्व

सांगोला :

                                         हतीद (ता.सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या संगीता बबन घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष केला.

           हतीद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच शालन भगत यांनी पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे, सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात मंडलाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा बरबडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी शिवसेनेच्या संगिता घाडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. हतीद ग्रामपंचायतीवर शिवसेना आ.शहाजीबापू पाटील यांचे वर्चस्व असून नूतन सरपंच संगीता घाडगे यांचा आ.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            यावेळी माजी सरपंच शालन भगत,उपसरपंच संतोष अधटराव,प्रदीप (बच्चू) घाडगे,कुलदीप घाडगे, संतोष कोळी,तानाजी घाडगे,संभाजी चव्हाण,भाऊसो घाडगे,सूर्यकांत घाडगे,संजय केदार,अशोक घाडगे, नानासो घाडगे,गणेश घाडगे,आदिनाथ घाडगे,सुरज घाडगे,विकास घाडगे,वैभव घाडगे,प्रतिक घाडगे,मयूर घाडगे,नामदेव घाडगे,राजकुमार कदम,प्रदीप घाडगे, प्रवीण घाडगे,राहुल घाडगे तसेच ग्रामसेवक बाबासाहेब नरळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button