महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसमवेत श्री अंबिकादेवीच्या दर्शनानंतर करणार प्रचाराचा शुभारंभ
सांगोला :
शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नारळ फोडून शुभारंभ होणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नुकताच प्रवेश केला होता.त्याचवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दीपकआबा साळुंखे-पाटील यांची उमेदवारी जाहीर करुन त्यांच्या हातात विजयाची मशाल दिली होती.आता,शिवसेना (उबाठा) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसमवेत सांगोला शहराचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवीचे दर्शन घेवून दीपकआबा यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असून यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील हे महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट),राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे दर्शन घेऊन करण्यात येणार आहे.यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख अरविंद पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ.धनंजय पवार,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर