शैक्षणिक

अभिनव पब्लिक स्कूल,अजनाळेच्या ६ खेळाडूंची राज्यस्तरीय बाल मैदानी स्पर्धेसाठी निवड

 

सांगोला :

सोलापूर जिल्हा सब ज्युनिअर ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल मैदानी स्पर्धेत सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १ सुवर्णपदक, ५ रौप्य पदक व ३ कांस्यपदक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे.

                   सोलापूर जिल्हा सब ज्युनिअर ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय बाल मैदानी स्पर्धेत सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलच्या प्रतिक नितीन अडसूळ याने ८ वर्ष वयोगटातून ५० मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तर,१०० मीटर धावणे स्पर्धेतही जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आणि स्टॅंडिंग ब्रॉड जंप-जिल्हा तृतीय क्रमांक मिळविला. श्रावणी प्रकाश लेंगरे ८ वर्ष वयोगटातून स्टँडिंग ब्रॉड जंप जिल्हा प्रथम,हर्षिता संदीप कोळवले ८ वर्ष वयोगटातून १०० मीटर धावणे – जिल्हा द्वितीय, स्टॅंडिंग ब्रॉड जंप जिल्हा द्वितीय,स्वरांगी राहुल कोळवले ८ वर्ष वयोगटातून स्टॅंडिंग ब्रॉड जंप जिल्हा द्वितीय,स्वराली रोहित बनकर १० वर्षे वयोगटातून स्टॅंडिंग ब्रॉड जंप जिल्हा द्वितीय, सुहानी रमेश चोरमले १४ वर्षे वयोगटातून लॉंग जंप जिल्हा तृतीय क्रमांक मिळवून वरील खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले.

सदर खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक विशाल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर व मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे यांनी अभिनंदन केले. तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button