राजकीय

स्व.आबासाहेबांच्या विचारांचा घेतलेला वसा कधीही विसरणार नाही – आम.डाॅ.बाबासाहेब देशमुख

आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांचा लोटेवाडी येथे सत्कार संपन्न‌

सांगोला :

         डाॅ.प्रमोद‌ सरगर यांनी ज्या विषयावरची पीएचडी मिळवली आहे,त्याचा फायदा नक्कीच आपल्या देशाला व राज्याला होईल.लहानशा गावात जन्म घेऊन एवढी मजल मारुन उच्च शिक्षण घेणे हे कांही कमी नाही.शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनेक सुविधा असतात.परंतु शिक्षणाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेत करुन आज शास्त्रज्ञ म्हणून उदयास येणे ही सोपी गोष्ट नाही.चिकाटी व जिद्द असेल तर,कांहीही अशक्य नाही,हे प्रमोदने दाखवून दिले आहे.डाॅ.प्रमोद यांनी इथेच न थांबता पुढील शिक्षणासाठी आणखीन पुढे प्रयत्न चालू ठेवावेत.शिक्षणासाठी परदेशी जावे लागले तर,त्यांना स्काॅलर‌शिप मिळवून देण्यासाठी सुध्दा प्रयत्न केले जातील.प्रमोद‌ सरगर यांचा आदर्श इतरही विद्यार्थांनी व कुटुंबांनी घ्यावा,असे आवाहन करुन आज या ठिकाणी माझाही सत्कार करण्यात आला.या ठिकाणाहून इथल्या माय बाप जनतेने माझ्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांचा आशिर्वाद मला दिला आहे व माझा विजय सुकर केला आहे.त्यामुळे, साहजिकच लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला येणाऱ्या काळात कधीही तडा जाऊ देणार नाही.कांही लोक आपल्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्याकडे दुर्लक्ष करा.मी स्व.आबासाहेबांच्या विचारांचा घेतलेला वसा कधीही विसरणार नाही,अशी ग्वाही आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करुन शेकापला पुन्हा एकदा यश मिळवून दिल्याबद्दल आमदार डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख यांचा सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी,आमदार डाॅ.बाबासाहेब‌ देशमुख यांच्या सत्काराबरोबरच लोटेवाडी गावचे सुपुत्र डाॅ.प्रमोद रामचंद्र सरगर यांनी ज्वारीच्या विषयावर पी.एच.डी. मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमास बापू ठोकळे,किशोर बनसोडे,रामचंद्र सरगर,अॕड.शंकर सरगर,रामचंद्र लवटे,सरपंच हिराबाई सरगर,गणेश दिक्षीत (सरपंच,खवासपूर),भाई चंद्रकांत सरतापे,किरण पाटील,तानाजी सावंत,उमाजी ब्रम्हदेव सावंत,के.एस‌.ढेरे,ज्ञानोबा लवटे,मच्छिंद्र करांडे,दाजी‌ लवटे,हरीदास ढेरे,भागवत काटे,सुमित चव्हाण, परमेश्वर सावंत,नानासो टिंगरे‌ यांच्यासह अनेक गावचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————————————

सत्काराच्या कार्यक्रमातही कामाचा केला निपटारा :

लोटेवाडी येथील विद्यमान ग्रा.पं.सदस्य दादासाहेब सावंत यांच्या वतीने आमदार डाॅ.बाबासाहेबांचा दुसरा सत्कार समारंभ भिमगनर येथे संपन्न झाला. यादरम्यान,दलित समाजातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली‌. दलित वस्तीतील कोणत्याही कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन आमदार डाॅ.बाबासाहेबांनी यावेळी दिले. उपस्थित नागरिकांनी मोरे‌वस्ती काटे वस्ती,देशमुख वस्तीवरील लाईटचे डी.पी.गेले दोन महिने बंद असल्याचे निदर्शनास आणुन दिले. तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब फोन लावुन आम.डाॅ.बाबासाहेबांनी बंद डीपीबाबत विचारणा केली असता,सदर डीपी लवकरच बसवले जातील,असे सांगीतले गेल्याने सत्काराच्या कार्यक्रमातही कामाचा निपटारा केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.‌

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button