राजकीय

सांगोल्यात शेकापच्या पदाधिकार्‍यांची आज विचार मंथन बैठक

 

सांगोला :

                         सांगोला विधानसभा मतदारसंघातील जिल्हास्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे संचालक व पदाधिकारी,सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,वि.का.सेवा सह.सोसायटीचे संचालक तसेच विवीध सह.संस्थांचे पदाधिकारी यांची विचार मंथन बैठक आज गुरुवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वा.शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे  आयोजित केली आहे.

या विचार मंथन बैठकीस शेकापचे ज्येष्ठ नेते तथा महानंदाचे संचालक चंद्रकांतदादा देशमुख तसेच शेकापचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख हे मार्गदर्शन करणार असून शेकापच्या पदाधिकार्‍यांनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन माजी सभापती बाळासाहेब काटकर, शेकापचे तालुका चिटणीस दादासाहेब बाबर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन गिरीश गंगथडे यांनी केले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button