सांगोला तालुक्यात सरपंचपदासाठी ४५ तर सदस्यपदासाठी २६५ अर्ज दाखल

 

सांगोला :

                                  सांगोला तालुक्यातील एकूण ६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरु असून ६ ग्रामपंचायतींच्या ६ सरपंच पदासाठी शुक्रवार दि.२ डिसेंबरअखेर तब्बल ४५ अर्ज दाखल झाले आहेत तर, सदस्यपदासाठी २६५ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे.

विशेष बाब म्हणजे, एकट्या चिंचोली ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी सर्वाधिक १८ जणांचे अर्ज दाखल झाले असून सांगोला तालुक्यातील चिणके ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी सर्वात कमी म्हणजे केवळ २ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे, चिंचोली ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी चांगलीच चुरस आणि चढाओढ लागली असल्याचे दिसून येते.

* सांगोला तालुक्यातील एकूण ६ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत निहाय प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची आज अखेरची माहिती :

१) चिंचोली – सरपंच पदासाठी – १८ अर्ज दाखल तर, सदस्य पदासाठी – एकूण ७५ अर्ज दाखल.

२) शिवणे – सरपंच पदासाठी – ६ अर्ज दाखल तर,सदस्यपदासाठी- ५३ अर्ज दाखल.

३) बलवडी – सरपंच पदासाठी – ९ अर्ज दाखल तर,सदस्य पदासाठी – ५१ अर्ज दाखल.

४) चिणके – सरपंच पदासाठी – २ अर्ज दाखल तर, सदस्य पदासाठी – ४० अर्ज दाखल.

५) अनकढाळ – सरपंच पदासाठी – ५ अर्ज दाखल असून सदस्य पदासाठी २० अर्ज दाखल.

६) पाचेगाव खुर्द – सरपंच पदासाठी एकूण ५ अर्ज दाखल तर, सदस्य पदासाठी – ४० अर्ज दाखल झाले आहेत.

एकंदरीत, सांगोला तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या होणार्‍या निवडणूकीत सरपंच पदासाठी शुक्रवार अखेर तब्बल ४५ अर्ज दाखल झाले आहेत तर, सदस्य पदासाठी २६५ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली.
—————————————————————————