नागपूर :
राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने,महागाई,शेती व पीकविम्याचा घोळ आदी मुद्द्यांवर येत्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस ही विद्यमान शिंदे सरकारला लक्ष्य करण्यासाठी रणनीती आखत असून खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर सुमारे १ लाख लोकांचा मोर्चा काढणार असल्याने यंदाचे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
कोवीडच्या प्रादुर्भावामुळे राज्याचे हिवाळी अधिवेशन हे मागील दोन वर्षांपासून मुंबईतच होत होते. यंदाचे हिवाळी अधिवेशन मात्र नागपूरमध्ये होत असून १९ डिसेंबरला अधिवेशन सुरु होईल.चार महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली अन् भाजपसोबत सरकार स्थापन केलं. परंतु,चार महिने उलटून गेले तरी ओला दुष्काळ नुकसान भरपाईला दिरंगाई, पीक विम्याचा प्रश्न, महागाई, राज्यपालांची वादग्रस्त विधाने आणि मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार इ.बाबींवरुन राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.
: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मोर्चा :
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंबंधी बोलताना माजी मंत्री दिलीप-वळसे पाटील म्हणाले की,”या सरकारच्या कामावर राज्यातील जनता नाराज असून जनतेमध्ये मोठा रोष आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले”असल्याचे
दिलीप वळसे-पाटील यांनी सांगीतले.
—————————————————————————
More Stories
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोल्याचे नूतन सभापती व उपसभापती स्वीकारणार पदभार
सांगोल्याच्या सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे सांगोल्याच्या राजकारणाचा झालायं पार बट्ट्याबोळ