सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली खा.संजय राऊत यांची भेट

 

मुंबई :

उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची धडाडती तोफ, हजरजबाबी व्यक्तीमत्व तसेच विरोधकांवर तुटून पडणारा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक व ईडीच्या पिंजऱ्यातून नुकताच सुटून आलेला वाघ,खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर
सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची मुंबईस्थित मातोश्रीवर भेट घेवून त्यांना त्यांच्या भावी राजकिय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनील कोकीळ,सोलापूर जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, सांगोला तालुका प्रमुख सूर्यकांत (नाना) घाडगे, उपतालुका प्रमुख गणेश कांबळे,विभागप्रमुख संतोष खडतरे, महुद शहर अध्यक्ष असलम मुलाणी, राजू साळुंखे तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.
—————————————————————————