औरंगाबाद :
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची विरोधक हे सातत्याने मागणी करत असून यावर बोलतांना “मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली तर, दोनच दिवसात राजीनामा देईन. मात्र, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन माझ्याविरुध्द सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी”, असे आवाहन नाम.अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना केले आहे.
शिंदे गटातील मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे गटाकडून सतत केली जात असून याबाबत औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देताच मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. मात्र,चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजयी होऊन दाखवावे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची विकेट विद्यमान खासदार जलील यांच्यामार्फत मीच घेतली होती. आता खैरे चांदीची गदा घेऊन फिरत असले तरी, त्यांच्या या गदेचा सामना करण्यासाठी आमची ढाल कधीही तयार असल्याचे कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
—————————————————————————
More Stories
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोल्याचे नूतन सभापती व उपसभापती स्वीकारणार पदभार
सांगोल्याच्या सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे सांगोल्याच्या राजकारणाचा झालायं पार बट्ट्याबोळ