सोलापूर

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सोलापूर राज्यात द्वितीय

 

सोलापूर :

                           स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये (२०२२) सोलापूर जिल्ह्याने देशात चांगली कामगिरी केली असून सोलापूर जिल्हा परिषदेने १ हजार गुणांपैकी ९५५.५३ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (२०२२) मध्ये राज्यात सिंधुदुर्गला प्रथम,सोलापूरला द्वितीय तर, सांगलीला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

सोलापूर जिल्ह्याने देशात पहिल्या टॉप ५० मध्ये स्थान पटकाविले असून देशात एकूण ७०९ जिल्हे आहेत. केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने नुकताच अहवाल प्रकाशित केला असून राज्यात पहिला आलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव झालेल्या जिल्हा गुणांकनात देशात दहावा आला आहे. १००० गुणांपैकी सोलापूर जिल्ह्याने ९५५.५३ गुण प्राप्त केले आहेत. त्यानुसार,महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग प्रथम,सोलापूर द्वितीय तर, सांगली तृतीय आला असून फिडबॅकमध्ये सोलापूर जिल्हा देशात द्वितीय आहे. मात्र, यंदापासून फिडबॅकसाठी देण्यात येणारा पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाने बंद केला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी “स्वच्छ व सुंदर शाळा तसेच स्वच्छतेबाबत विविध उपक्रम” हाती घेतले होते. त्यामुळे, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सोलापूर जि.प.ने चांगली कामगिरी केली असून वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय,सांडपाणी व्यवस्थापनसाठी परसबागा,शोषखड्डे,स्वच्छ व सुंदर शाळेमुळे शालेय स्वच्छतागृह तसेच घनकचरा व्यवस्थापन अशा एक हजार गुणांचे रॅंकिंग होते.चांगली कामगिरी केल्यामुळे जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button