राजकीय

होलार समाज व बहुजन समाजाच्या वतीने सांगोला येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन

 

सांगोला :

होलार समाज अभ्यास आयोग स्थापन करावा,होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,या व इतर महत्वाच्या मागण्यांसाठी सोमवारी १९ जून रोजी सकाळी १० वा.सांगोला येथील पंचायत समिती समोरील पंढरपूर-मिरज हायवेवर स्वाभिमानी होलार समाज संघटना व बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

होलार समाज अभ्यास आयोग स्थापन करावा, होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,नाझरा (ता.सांगोला) येथील युवक नेते नितीन रणदिवे यांच्यावर झालेला खोटा गुन्हा मागे घ्यावा,नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव यांच्या खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व त्या कुटुंबाचं पुनर्वसन महाराष्ट्र शासनाने करावे तसेच सांगोला तालुक्यातील बेरोजगारांना व युवकांना उद्योग व्यवसायासाठी मुद्रा लोन योजना प्रभावी अंमलबजावणी साठी सांगोला तहसीलदार यांनी बैठक आयोजित करावी,सांगोला शहरात होलार समाजासाठी स्वतंत्र बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात यावे व सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत पूर्वीपासून राहणाऱ्या नागरिकांना त्या जागा नोंदीत करून “महाराष्ट्र शासन” याऐवजी, मूळ मालकाच्या नांवे असेसमेंट करुन ग्रामपंचायत उतारा देण्यात यावा व सर्व खुल्या जागा नियमित नोंदीत करण्यात याव्या,रमाई घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत २ लाख ५० हजार रुपये अनुदान करण्यात यावे,वाद्य कलावंतांना १५ हजार रुपये मानधन मिळावे,मागील अनेक वर्षापासून केसरी कार्ड धारकांचे जे धान्य बंद आहे,विभक्त व इतर कारणांसाठी ते धान्य त्वरित चालू करावे,दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून ५ एकर जमीन मिळावी तसेच विधवा पेन्शन योजना,प्रताप काळ पेन्शन योजना व निराधार पेन्शन योजना आणि ज्या महिलांच्या विधवांच्या पेन्शन बंद केलेल्या आहेत,त्या त्वरित चालू करून त्यांना शासकीय अनुदान व त्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा, अंगणवाडी पदोन्नतीमध्ये जो काळा बाजार झालेला आहे तो,त्वरित थांबवून मूळ मागासवर्गीयांना पदोन्नती देण्यात यावी,वरील सर्व मागण्या मान्य करण्यासाठी होलार समाजाचे महाराष्ट्राचे नेते शिवाजीराव जावीर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे,अशी माहिती रास्ता रोको आंदोलनाचे आयोजक दिपक ऐवळे (कमलापूर) यांनी पत्रकार परिषदेत दिली असून होलार समाज व बहुजन समाजातील नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन वरील मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही केले आहे.—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button