मुंबई :
लोकशाही पद्धतीने होणाऱ्या कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या पक्षांतर्गत निवडणूकीसाठी सोमवारी घेण्यात आलेल्या मतदानात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आम.प्रणिती शिंदे यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रदेश प्रतिनिधी मतदारांनी मुंबईत मतदान केले
एकीकडे देशात दडपशाहीच्या जोरावर लोप पावत चाललेली लोकशाही तर दुसरीकडे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा,लोकशाही देणारा व देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा कॉंग्रेस पक्ष भारत जोडो यात्रा काढून आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची पक्षांतर्गत निवडणूक लोकशाही पद्धतीने घेऊन काँग्रेस पक्ष देश आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,हेच यातून दिसून येत असून सोमवारी संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ठिकठिकाणी मतदान झाले असता सोलापूर शहर व जिल्ह्यातील मतदारांनीही मुंबई येथे मतदान केले असल्याची माहिती सोलापूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथील मतदान केंद्रावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आम. प्रणिती शिंदे यांचेसह प्रदेश प्रतिनिधी (मतदार) सोलापूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले,माजी आमदार प्रकाश यलगुलवार,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील,सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे,जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी,शहर उपाध्यक्ष सुशील बंदपट्टे तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रदेश प्रतिनिधी मतदारांनीही मतदान केले.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
सांगोला तालुक्यातील शेकाप व इतर पक्षातील 450 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोल्याचे नूतन सभापती व उपसभापती स्वीकारणार पदभार
सांगोल्याच्या सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार