पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली, त्यांच्या जागी आता शिरीष सरदेशपांडे
सोलापूर :
सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तेजस्वी सातपुते यांची गुरुवारी बदली झाली असून त्यांच्या जागी सोलापूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आता शिरीष सरदेशपांडे हे येणार आहेत.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्हेगारांवर चांगलाच वचक ठेवला होता. विशेषत: वाळूमाफीयांविरुध्द त्यांनी मोहीम उघडून वाळूची तस्करी करणार्यांविरुध्द अनेकवेळा त्यांचेवर कारवाईचा बडगा उचलला होता.
नवे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे सध्या नाशिक येथे पोलीस अकादमीमध्ये पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असून ते आता सोलापूरचे नवे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पदभार घेतील. मावळत्या पोलीस अधीक्षक
तेजस्वी सातपुते यांची बदली कोठे झाली ? याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नसून त्यांच्यासह इतर कांही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे समजते.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^