सांगोला :
अत्याधुनिक आणि प्रगत बँकिंग सुविधा असलेल्या एलकेपी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, लि.मंगळवेढा या शाखेचा लोकार्पण सोहळा सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी दिली
एलकेपी मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,लि. मंगळवेढा या शाखेच्या लोकार्पण सोहळ्याचा शुभारंभ सोमवारी दुपारी मंगळवेढा येथील सरकार चौकातील कै. दादासाहेब नागणे कॉम्प्लेक्स येथे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते तर,आम.समाधान आवताडे यांचे अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी, माजी आमदार प्रशांत परिचारक, फॅबटेक उद्योग समुहाचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर,धनश्री मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन निल सावंत, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव,माजी सभापती तानाजी काकडे, माजी नगराध्यक्ष भारत नागणे, दामाजी शुगरचे व्हा. चेअरमन तानाजी खरात, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे अनिलभाऊ इंगवले यांनी सांगीतले.
अनिलभाऊ इंगवले याबाबत माहिती देताना पुढे म्हणाले की, आकर्षक लाभ देणाऱ्या विश्वसनीय योजना एलकेपी मल्टिस्टेट बँकेने सुरु केल्या असून यामध्ये एलकेपी दाम चौपट ठेव योजना, एलकेपी दाम तिप्पट ठेव योजना, एलकेपी दाम दीडपट ठेव योजना व एलकेपी दाम दुप्पट ठेव योजना या फायदेशीर योजना सुरु केलेल्या आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती,विधवा, संत महंत,माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदरापेक्षा ०.५ टक्के व्याजदर जादा राहील आणि २४ महिन्याच्या पुढे १३ टक्के व्याजदर राहील. त्याचबरोबर व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना असून सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज,व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज,पिग्मी कर्ज, मासिक ठेव योजना,एलकेपी कन्यादान ठेव योजना, एलकेपी पेन्शन योजना व शेतकऱ्यांसाठी एलकेपी मल्टीस्टेटमध्ये दुधाचे पेमेंट जमा करा व त्यावर कर्ज मिळवा,अशा विवीध योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने