सांगोल्याच्या स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली मेंदूवरील शस्त्रक्रिया

 

सांगोला :

सांगोला येथील स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका ७० वर्षीय वृध्दाच्या मेंदूवरील किचकट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

७० वर्षीय वृध्द पुरुष अचानक बेशुद्ध पडला,बोलू शकत नव्हता,हात पाय हलवू शकत नव्हता. त्यामुळे, सांगोला येथील एका खाजगी दवाखान्यात आणले असता प्राथमिक अवस्थेमध्ये,मेंदूमध्ये रक्तपुरवठा बंद झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले व सोलापूर येथील मेंदू मणका उपचार केंद्र असलेल्या हॉस्पिटल मध्ये पेशंटला घेऊन जावे लागेल,असे पेशंटच्या नातेवाईकांना सांगितल्याने काय करावे ? हे त्यांना कळेना.

                                 पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटला स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आणले.स्पंदन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने पेशंटची स्थिती चेक करुन मेंदूचे स्कॅन केले.त्यामध्ये उजव्या बाजूच्या मेंदूच्या रक्तवाहिनी मध्ये रक्तपुरवठा बंद झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले.ही अवस्था अतिशय गंभीर स्वरुपाची अवस्था असते.त्यामुळे,सर्व परिस्थितीची कल्पना नातेवाईकांना दिली असता, नातेवाईकांनी “जेवढे होता होईल तेवढे प्रयत्न करा, स्पंदनमध्ये उपचार होणार नसेल तर आम्ही पेशंट घरी घेऊन जातो”,असा विश्वास स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमवर दाखवल्याने स्पंदनची टीम कामाला लागली.

सांगलीचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. देवदत्त पाटील यांना सर्व रिपोर्ट व तपासण्या पाठवून दिले असता, त्यांनी ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे सांगितले.  त्यानुसार,नातेवाईकांशी बोलून त्यांनी ऑपरेशन करण्यास संमती दिल्यानंतर रविवारी २ मार्च रोजी मेंदू व मनका तज्ञ डॉ.देवदत्त पाटील व त्यांच्या टीमने क्रेनिओटॉमी नावाचे मेंदूवरील दाब कमी करण्याचे गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. यावेळी भूलतज्ञ म्हणून डॉ.शीतल येलपले यांनी काम पाहिले.सदर ऑपरेशन अतिशय किचकट व गुंतागुंतीचे होते,हे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत स्पंदन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
——————————————————————

स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदू,मणका, फुफ्फूस,क्रिटिकल केअर, लहान मुलांचे आजार,स्त्रियांचे आजार,हाडांचे आजार,पोटाचे आजार,नवजात बालक व आतड्यांच्या शस्त्रक्रिया अपघात इत्यादी विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात. त्याचबरोबर सर्व कंपन्यांचे कॅशलेस इन्शुरन्स उपलब्ध आहेत.स्पंदनमध्ये डॉ.योगेश बाबर,डॉ.किरण जगताप,डॉ.वैभव जांगळे, डॉ.गणेश गुरव,डॉ.राहुल इंगोले यांचेसह इतर डाॅक्टर्सची टीम सतत तैनात असते.
—————————————

८ मार्चला महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर  :

जागतिक महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी महान भूमी महिला नागरी सहकारी बँक व स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबीरामध्ये महिलांच्या आरोग्य विषयी तपासणी करण्यात येणार.
– चेअरमन ॲड.अय्युब पटेल