सांगोला :
सांगोल्याचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करुन माण व कोरडा नदीवरील बंधारे भरुन देण्याची मागणी कांही दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे तसेच पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आक्रमकपणे केलेली होती. आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या या मागणीला यश आले असून टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु झाले आहे.

टेंभू व म्हैसाळ योजनेतील पाण्याचे आवर्तन सुरु झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडून पूर्ण क्षमतेने भरुन घेण्यात येणार आहे.त्यानंतर टेंभूचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन देण्यात येणार आहेत. तसेच टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन मिळाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.
टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु झाल्याने शेतकरी वर्गात सध्या आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून लोकप्रिय आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून आवर्तन सुरु झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने