सांगोला :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे दीड वर्षांपूर्वी लेखी पत्राद्वारे मागणी केल्याप्रमाणे सांगोला तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन ६ रुग्णवाहिकांची पूर्तता झाली असून त्यामुळे गावातील गरोदर महिला, नवजात शिशु,लहान मुले तसेच अपघातग्रस्त व सर्वसामान्य रुग्णांना गाव,घरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत उपचारासाठी तातडीने मदत मिळणे सोयीचे होणार असल्याचे मत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
सांगोला तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्याने मिळालेल्या ६ रुग्णवाहिकांचे पूजन शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शनिवारी सांगोला पंचायत समितीच्या आवारात पुष्पहार घालून व श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ.अविनाश खांडेकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याण ढाळे,संजय मेटकरी,आरोग्य सहाय्यक जिलानी काझी,आरोग्य कर्मचारी व रुग्णवाहिकेचे सर्व चालक उपस्थित होते.

सांगोला तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील पूर्वीच्या रुग्णवाहिकांना १० वर्षे पूर्ण झाल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे त्या आरोग्य विभागाकडे जमा होणार असून सांगोला तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने गावे व वाड्यावस्त्या या चोहोबाजूंनी विखुरलेल्या आहेत. त्यामुळे त्या गावातील रुग्णांना वेळेत रुग्णसेवा मिळावी,वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब लागू नये,यादृष्टीने नव्याने सर्व सोयी सुविधायुक्त अशा रुग्णवाहिका मिळाव्यात,म्हणून तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार,शासनाकडून नवीन ६ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
——————————————————————————
रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांना आनंद :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासनस्तरावरुन नवीन ६ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या होत्या.परंतु आचारसंहितेमुळे त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात दिल्या नव्हत्या.अखेर काल शनिवारी सांगोला पंचायत समितीच्या आवारात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याच हस्ते नवीन रुग्णवाहिकांचे पूजन करुन त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करण्यात आल्या.प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांसह ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर