राजकीय

पुन्हा महायुतीचेच सरकार येणार व विकासकामांचा रथ गतीने पुढे जाणार – माजी आमदार प्रशांत परिचारक

शहाजीबापूंना मिळणार विक्रमी मताधिक्य व मंत्रीपदाची संधी

आम.शहाजीबापूंच्या प्रचारसभेस भाळवणी गटात प्रचंड प्रतिसाद

सांगोला :

          राज्यातील महायुती सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आखल्या.राज्यात व देशात एकाच पक्षाचे व विचाराचे सरकार सत्तेत असल्यास मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण होतात.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची नेत्रदीपक अशी कामे करत विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “आम.शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा,त्यांना नामदार करु”,असे सांगोल्यातील सभेमध्ये जाहीर केले आहे.सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी आणण्यामध्ये शहाजीबापू पाटील आघाडीवर आहेत.राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येईल व विकास कामांचा रथ गतीने पुढे जाईल,असे मत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाळवणी येथे व्यक्त केले.

          सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत आम.प्रशांत परिचारक बोलत होते.यावेळी व्यासपीठावर श्रीकांतदादा देशमुख,दादासाहेब लवटे, राजश्रीताई नागणे पाटील,शिवाजी अण्णा गायकवाड,  नवनाथ भाऊ पवार,ॲड.महादेव कांबळे,ॲड.दीपक पवार,भगवानराव चौगुले,शिवाजीराव बाबर,संजय मेटकरी,विलास देठे,नवनाथ माने,रणजीत जाधव, महादेव आयरे,समाधान सुरवसे,अण्णासाहेब गवळी, प्रकाश देठे,नाना मोरे,हरिभाऊ शिंदे,बालाजी बागल, अविंदा गायकवाड, सुनील पाटील,धैर्यशील निंबाळकर,तानाजी वाघमोडे,आबाजी शेंडगे, किरण दानोळे,सचिन भोसले, रामभाऊ ढोबळे,राहुल पाटील, धनंजय काळे,हणमंतदादा सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

      यावेळी बोलताना प्रशांतराव परिचारक पुढे म्हणाले की,भाळवणी गटातील भंडीशेगाव,धोंडेवाडी,जैनवाडी आदी गावातील प्रचारसभेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. पूर्वी आमदारांना ३० ते ४० कोटी रुपयांचा विकास निधी मिळायचा.परंतु महायुती सरकारने सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी ५ हजार कोटीहून अधिक निधी देऊन विधानसभा मतदारसंघाचा कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांक आणला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या.केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असेल तर जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी चांगली संधी मिळते. केंद्र व राज्य सरकारने रस्ते , शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्या, लाडकी बहिण योजना,केंद्राची व राज्याची किसान सन्मान निधी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी योजना,मुली व महिलांसाठी विकासाच्या योजना,प्रत्येक घराला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज,प्रधानमंत्री आवास योजना, आधुनिक पद्धतीच्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले. यासारख्या अनेक लोककल्याणकारी योजना सरकारने राबवल्या.राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर आणण्यासाठी व शहाजीबापूंना आमदार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करुन विक्रमी मताधिक्य द्या.आम.शहाजीबापू पाटील यांना नामदार होण्याची संधी मिळणार आहे.दिलेला शब्द पाळणाऱ्या महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर आणा,असे आवाहन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आम.प्रशांतराव परिचारक यांनी आम.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी येथील सभेमध्ये केले.
          ——————————————————————

पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवाराने केला,विक्रमी मताधिक्य देण्याचा संकल्प :

राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगोला तालुक्यासाठी ५ हजार कोटीहून अधिक निधी दिला. या निधीच्या माध्यमातून सांगोला तालुका व पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटात नेत्रदीपक अशी विकास कामे केली.समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही सहभागी होतो. त्यावेळी राज्याची प्रगती ठप्प होती.त्यानंतर सरकारमध्ये राजकीय उठाव घडला व राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले.सव्वा दोन वर्षाच्या काळात मतदार संघात विकासकामे करुन परिवर्तन केले.सांगोला तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी शेतीच्या पाण्याच्या अनेक योजना मार्गी लावल्या.तसेच पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी एकही गाव वंचित राहणार नाही,यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले.सांगोला व पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटाच्या विकासासाठी व तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रचंड मोठी एमआयडीसी व उद्योगधंदे या भागात आणून तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे.भाळवणी गटासाठी व सांगोला तालुक्यातील कांही भागासाठी जिहे-कटापूर योजनेतून १ टीएमसी पाणी मंजूर केले व उजनीचा निरा उजवा कालवा या दोन्ही योजनेच्या माध्यमातून भाळवणी गटासाठी बारमाही पाणी देण्याचे नियोजन आखले आहे. सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा दिला.त्याचप्रमाणे कासाळ ओढ्याला कालव्याचा दर्जा देण्याचा निर्धार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या योजना यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने राबवल्या नाहीत.शेतकऱ्यांची वीज बिल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केली आहे.सांगोला विधानसभा मतदारसंघाचा सोन्यासारखा विकास करेन. बारामतीसारखा सांगोला व भाळवणी गटाचा विकास करण्यासाठी या निवडणुकीत विक्रमी मताधिक्य देऊन विकासासाठी ५ वर्षे पुन्हा एकदा संधी द्यावी.मुख्यमंत्र्यांनी मला मंत्री करण्याचा शब्द दिला आहे.माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनाही मंत्रिमंडळात मंत्रीपदाची संधी मिळणार आहे.त्यासाठी भाळवणी गटातील पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवार यांनी विक्रमी मताधिक्य देण्याचा संकल्प केला आहे.                       – आम.शहाजीबापू पाटील

भाळवणी गटात आम.शहाजीबापूंना विक्रमी मताधिक्य देणार :

सांगोला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आम.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारादरम्यान भाळवणी गटातील प्रत्येक गावातून महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार            बंधू-भगिनींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून आ.शहाजीबापूंचे स्वागत प्रत्येक गावात फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करत जल्लोषात केले जात आहे. भाळवणी गटात आम.शहाजीबापू पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने त्यांना खंबीर साथ देवून विजयी करण्याचे वचन दिले जात आहे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा महायुतीच्या नेते मंडळींचा संकल्प असून आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताधिक्य देणार.
                              – पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवार
             ——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button