महत्वाच्या बातम्या

आ.शहाजीबापूंना प्रचंड मतांनी विजयी करा – अभिनेता गोविंदा

उद्याची निवडणूक उज्वल भवितव्य घडवणार - आम.शहाजीबापू पाटील

सांगोला :

प्रत्येकाच्या जीवनात संस्कार महत्त्वाचे असून जीवनात आईची शक्ती ही प्रेरणादायी आहे.जीवनात आईवडील हेच आपले दैवत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श व प्रेरणास्थान आहेत. भारतीय भूमीत वारकरी,थोर समाज सुधारक व शूरवीर घडले.आमदार शहाजीबापू पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देत आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी खासदार व सिनेअभिनेता गोविंदा यांनी सांगोला येथे केले.

           सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आम.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रोड शो व रॅलीनंतर सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,शिवसृष्टी येथील जाहीर सभेप्रसंगी सिनेअभिनेता गोविंदा हे बोलत होते.यावेळी, सिनेअभिनेता व माजी खासदार गोविंदा यांचा सत्कार आम.शहाजीबापू पाटील,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख राणीताई माने,शहरप्रमुख छायाताई मेटकरी व सांगोला शहरसंघटक आनंदाभाऊ माने यांच्या हस्ते करण्यात आला.

             यावेळी चेतनसिंह केदार-सावंत,खंडू सातपुते, सुनीलनाना पवार,विजय बनसोडे,नवनाथभाऊ पवार,  सचिन काटे,दीपक दिघे,राहुल घोंगडे,दामोदर साठे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शिवाजीअण्णा गायकवाड,राजश्रीताई नागणे-पाटील,श्रीकांतदादा देशमुख,मुबीना मुलाणी,हरिभाऊ पाटील,वसंत सुपेकर,आनंद घोंगडे,समाधान सावंत,अरुण बिले, समीर पाटील,माऊली तेली,महादेव कांबळे,डॉ.मानस कमलापूरकर,आस्मिर तांबोळी,डॉ.विजय बाबर,सुरज पाटील,बाळासाहेब आसबे,सोमेश्वर यावलकर, काशिलिंग गाडेकर,सुजित भोकरे,काशिलिंग गावडे, अच्युत फुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी,युवासेना पदाधिकारी,एससी सेल,ओबीसी सेलचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सिनेअभिनेता गोविंदा पुढे म्हणाले की,सांगोल्याशी माझे जुने ऋणानुबंध आहेत.मी कोल्हापूरला जाताना सांगोला येथील ज्योतिर्लिंग येथे भोजन करुन पुढे गेलो.शिवसेनेला जोडलेला हिरो म्हणजे गोविंदा,अशी माझी खासियत आहे.स्व. बाळासाहेब ठाकरे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत.यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतले असून हे नेते भूतलावरचे तारे आहेत.यावेळी त्यांनी चित्रपटातील अनेक गीते गात सर्वांना खळखळून हसायला लावले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शहाजीबापू पाटील हे विजयी होतील व त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील,असा आशीर्वाद देत त्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या.
——————————————————————————

आपण मला आमदार करा, मुख्यमंत्री नामदार करतील :

शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर मी निवडणूक लढवत असून महायुतीतील प्रमुख नेतेमंडळी ही माझी खरी ताकद आहे. माझ्यावर तालुक्यातील जनतेचा शंभर टक्के विश्वास असून ही समोरची गर्दी याची पोहोचपावती आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांना न्याय देणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना पुन्हा ताकद देण्यासाठी व मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे.माझ्या आजारपणात ही निवडणूक होत असून प्रत्येकाने एक एक मत गोळा करुन उद्याची निवडणूक जिंकायची आहे.ही निवडणूक उज्वल भवितव्य घडवणारी आहे.राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येणार असून आपण मला आमदार करा, मुख्यमंत्री नामदार करतील, असा विश्वास आहे.                  – आमदार शहाजीबापू पाटील                 —————————————

गोविंदाची सभा शहाजीबापूंच्या विजयासाठी उपस्थितांना प्रेरणा देणारी :

सांगोला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला येथील अंबिकामातेचे दर्शन घेऊन माजी खासदार व सिने अभिनेता गोविंदा यांनी केलेला रोडशो व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील विराट जाहीर सभा ही उपस्थितांना शहाजीबापूंच्या विजयासाठी प्रेरणा देणारी आहे. यावेळी या सभेसाठी हजारोंच्या संख्येने मतदार बंधू, भगिनी उपस्थित होते. गोविंदा यांच्या भाषणाच्यावेळी मुस्लिम समाज बांधवांच्या नमाजसाठी अजान चालू असताना त्यांनी आपले भाषण थांबवून प्रार्थनेला,नामस्मरणाला प्राधान्य दिले व नंतर भाषण सुरु केले.या ठिकाणी महाराष्ट्राच्या आदर्श संस्कृतीचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने मतदार बंधू-भगिनी व युवक वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button