आरोग्य

सांगोला नगरपरिषदेकडून प्रतिबंधित प्लास्टीक जप्ती मोहीमेअंतर्गत व्यापार्‍यांवर कारवाईचा बडगा

 

सांगोला :

          सांगोला नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधित प्लास्टीक जप्ती मोहीमे अंतर्गत सांगोला शहरातील व्यापारी व दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून त्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.या टास्क फोर्सकडून शुक्रवारी प्लास्टीक बंदी अंतर्गत शहरातील ८९ दुकानांची तपासणी करण्यात आली असता, या तपासणी दरम्यान,दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित व्यापार्‍यांकडून रक्कम रुपये ७४००/- इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.तसेच सदर मोहीमे अंतर्गत आत्तापर्यंत दीडशे किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक विनोद सर्वगोड यांनी दिली.

सध्या सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरात प्रतिबंधित प्लास्टीक जप्ती मोहीम राबविण्यात येत असून घंटागाडीत कचरा न टाकता इतर ठिकाणी कचरा टाकणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर नगरपरिषदेमार्फत कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.शासनाने प्रतिबंधित केलेले थर्माकोल,सिंगल युज प्लास्टिक व प्लास्टीक कॅरीबॅग्ज याचा वापर व्यापारी व नागरिकांनी करु नये,असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले असून जे नागरिक व व्यापारी हे प्रतिबंधित प्लास्टीक किंवा थर्माकोल यांचा वापर करतील,अशा सर्व नागरिकांवर तसेच व्यापाऱ्यांवर शासनाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.

सदर जप्ती पथकात स्वच्छता निरीक्षक विनोद सर्वगोड,गणेश गळीयल,निलेश कांबळे,अनिकेत चंदनशिवे, आशिष बनसोडे,प्रफुल्ल धनवडे इ.कर्मचारी कार्यरत आहेत.
—————————————————————————

सांगोला शहर प्लास्टीक मुक्त व स्वच्छ ठेवावे :

                   सांगोला नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित केलेले थर्माकोल,सिंगल युज प्लास्टिक व प्लास्टीक कॅरीबॅग्ज याचा वापर करु नये, तसेच आपले शहर प्लास्टीक मुक्त व स्वच्छ ठेवावे.
                               – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button