सांगोल्यातील आनंद हाॅस्पीटलमध्ये सामाजिक उपक्रमांतर्गत आता अल्प दरात शस्त्रक्रिया

 

सांगोला :

वैद्यकिय क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, गरजू नागरिकांची नि:स्वार्थपणे सेवा करण्याची आपली एक सामाजिक जबाबदारी डोळ्यांसमोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी व समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करुन सांगोला शहर व तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांना अत्यल्प दरात वैद्यकिय सेवा देण्यात नेहमीच अग्रेसर ठरलेल्या आनंद हाॅस्पीटलच्या व्यवस्थापक मंडळाने आता अगदी अल्प दरात सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डाॅ.अमर शेंडे,डाॅ.परेश खंडागळे व डाॅ.स्वाती खंडागळे यांनी दिली आहे.

          यामध्ये सिझेरियन, गर्भाशयाची पिशवी काढणे, मुळव्याध, अपेंडिक्स, हर्निया, फिशर व फीच्युला या सर्व शस्त्रक्रिया (आँपरेशन) या केवळ १९ हजार ७५० रुपयांमध्ये केल्या जाणार असून यामध्ये हाॅस्पीटल, मेडिकल, भूल,रक्त तपासणी,ईसीजी,एक्स-रे व सोनोग्राफी हे सर्व खर्च समाविष्ट आहेत. तसेच, कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया (पॅकेज) ही ९ हजार ५०० रुपये, गर्भाशयाची पिशवी साफ करणे (पॅकेज) यासाठी ८ हजार ५०० रुपये, नाॅर्मल डिलेव्हरी (पॅकेज) ७ हजार रुपये, वेदना विरहीत डिलेव्हरी (पॅकेज) १२ हजार रुपये इतक्या अल्पदरात करण्यात येणार असून यामध्ये हाॅस्पीटल,मेडिकल, भूल व रक्त तपासणी हे सर्व खर्च समाविष्ट आहेत.गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यामध्ये समाविष्ट नसून त्याचे दर हे रुग्णाच्या त्या-त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहतील.

एक सामाजिक जबाबदारी म्हणून जनतेच्या सेवेसाठी वरीलप्रमाणे अगदी अल्प दरात विवीध शस्त्रक्रिया केल्या जातील तरी,या संधीचा रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन डाॅ.अमर शेंडे,डाॅ.परेश खंडागळे व डाॅ.स्वाती खंडागळे यांनी केले आहे.

—————————————————————————