महत्वाच्या बातम्या

वाखरी येथे रविवारी राज्यस्तरीय मराठा व्यवसायिक सोहळा, वस्तू प्रदर्शन व विक्री

 

सांगोला :

मराठा बिझनेस असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मराठा व्यवसायिक सोहळा व मराठा उत्पादकाचे वस्तू प्रदर्शन व विक्री आणि प्रसार रविवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सदगुरु मंगल कार्यालय (पुणे रोड,वाखरी,ता.पंढरपूर) येथे होणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे सांगोला तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी दिली.

कांही ध्येय वेड्या मराठा तरुणांनी चार वर्षांपूर्वी ही चळवळ सुरु केली आणि 1 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या साक्षीने या संघटनेस मूर्त रुप आले.संपूर्णपणे मराठ्यांनी,मराठ्यांसाठी चालवलेली एक अशी चळवळ ज्याचा केंद्रबिंदू हा उद्योगधंद्यात स्वतःच्या पायावर उभे असलेला व नव्याने उद्योजक होऊ पाहणारा मराठा तरुण हाच राहिला आहे. “सहकार्यातून समृद्धीकडे” या ब्रीद वाक्याला अनुसरूनच महा मराठा समाजाने एकमेकांच्या सहकार्याने समृद्धीकडे वाटचाल करावी,जेणेकरून मराठा समाजास उद्योगाचे महत्त्व सांगून त्यांना उद्योजकतेकडे वळविणे हा मुख्य उद्देश आहे. या संघटनेची कार्यपद्धती फेसबुक व्हाट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच समाजातील तळागाळातील 300 पेक्षा जास्त ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा तसेच तालुकास्तरावर आपले एडमिन व पदाधिकारी तुमच्या व्यवसायाची जाहिरात पूर्ण महाराष्ट्रभर कांही मिनिटातच पोहोचवितात.तसेच मराठा समाजासाठी असणार्‍या शासकीय योजनांची माहिती तळागाळातील सामान्य मराठा तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य निस्वार्थीपणे करत आहेत.

या कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याज परतावा योजने विषयी सोलापूर जिल्हा समन्वयक योगेश वाघ हे माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत.तसेच समाज प्रबोधनकार शिवव्याख्याते झी टॉकीज फेम ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे हे “अध्यात्माची उद्योजकांसाठी गरज” याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर कार्पोरेट ट्रेनर व चीफ मॅनेजर फॉक्स्वागेन ग्रुप ऑफ कंपनीचे अविनाश घोगरदरे हे “यशाची चावी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखाना,पंढरपूरचे चेअरमन तथा डीव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील हे “उद्योजकता एक सहज शक्य आव्हान” याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मराठा उद्योजकांचा सत्कार समारंभ करण्यात येणार आहे.

या राज्यस्तरीय मराठा व्यावसायिक सोहळ्यासाठी प्रवेश व वाहन पार्किंग मोफत आहे.त्याचबरोबर मराठा वधू- वर सूचक मंडळातर्फे मोफत नांव नोंदणी कक्ष ठेवण्यात आला असून याकरिता,वधू-वरांचे बायोडाटा फोटो व मराठा जातीचा दाखला झेरॉक्स सोबत घेऊन यावे. तरी, या राज्यस्तरीय मराठा व्यवसायिक सोहळ्यामध्ये सांगोला तालुक्यातील मराठा उद्योजक बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा,असे आवाहन  तालुकाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी केले आहे.

—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button