दीपकआबांना आमदार केल्यास तालुक्यातील सर्व वाहनांना अनकढाळ टोलनाका मोफत – नितीनभाऊ रणदिवे
लहुजी पँथर सेनेचे वाहनधारकांसाठी आश्वासन
सांगोला :
आतापर्यंत अनेक आंदोलने करुन अनकढाळ टोलनाक्यावर जड व अवजड वाहनांना ५० टक्के सवलत मिळवून देण्यात यश आले असून सांगोला तालुक्यातील वाहनांना पासची सवलत देण्यात आली आहे. चालू विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करणार असून सांगोला तालुक्यातील सर्व वाहनांना अनकढाळ टोलनाका मोफत करुन देणार असल्याचे आश्वासन लहुजी पँथर सेनेचे संस्थापक,अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी दिले आहे.
यावेळी,बोलताना लहुजी पँथर सेनेचे संस्थापक, अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी सांगितले की, सांगोला तालुक्यातील वाहनांना अनकढाळ टोळ नाक्यावर टोलमाफी मिळावी,यासाठी अनेक रास्ता रोको आंदोलन केले असून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. सांगोला तालुक्यातील सर्व वाहनधारकांना अनकढाळ टोलनाक्यावर टोलमाफी मिळावी,यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबांना आमदार करणे गरजेचे आहे. गोरगरीब,दीन दलित,वंचित व उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी दीपकआबा १८-१८ तास काम करीत असून समाजासाठी दिवसातील १८-१८ तास वेळ देणारा लोकनेता अशी दीपकआबांची ओळख आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दीपकआबांना प्रचंड मतांनी विजयी करुन विधानसभेत पाठवण्यासाठी तालुक्यातील सर्व वाहन धारकांनी सज्ज रहावे. सांगोला तालुक्यातील सर्व जड, अवजड वाहनधारकांनी दीपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे व त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहन लहुजी पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी केले आहे.
——————————————————————————
लहुजी पँथर सेना दीपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी :
सांगोला तालुक्याच्या हक्कासाठी लढा देणारे महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्या पाठीशी लहुजी पँथर सेना खंबीरपणे उभी राहिली असून सर्व कार्यकर्त्यांनी दीपकआबांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.तालुक्यातील सर्व समाजाचा दीपकआबांना पाठिंबा वाढत आहे.अशावेळी वंचित व उपेक्षित समाजाला न्याय देणाऱ्या दीपकआबांना यंदा आमदार करणारच. – नितीनभाऊ रणदिवे