शेकापचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे प्रचारासाठी महिलांची लगबग
सांगोला :
सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना विजयी करण्याचा संकल्प शेकापच्या महिला आघाडीने केला असून त्यांचे शिट्टी हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांची मोठी लगबग दिसून येत आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरासह ग्रामीण भागात स्व.आबासाहेबांच्या कन्या शोभाताई पाटील,डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अर्धांगिनी डॉ.निकीताताई देशमुख व मितीला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार सुरु आहे. मतदार संघातील विकासाला खिळ बसली असून आता तुम्ही साथ द्या,तुमच्या साक्षीने सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नंदनवन करु,अशी साद डॉ.निकीताताई देशमुख या महिला भगिनींना घालत आहेत.
या प्रचारफेरीत सुप्रिया देशमुख,स्वाती मगर,विद्या जाधव,फर्जाना खतीब,वैशाली झपके,स्मिता बनसोडे, सविता बनसोडे,रेखा बनसोडे,हिना मुलाणी,वैशाली बेहेरे,स्मिता बेहेरे,स्मिता देशमुख,सुरेखा मदने,संजीवनी शिंगाडे,छाया एरंडे,नीताताई ढोबळे,सुरेखा सपाटे,उषा लोखंडे,राणी लवटे,गीता गुळमिरे,निलोफर मुजावर, शुभांगी बनसोडे,कोमल भंडारे,स्मिता इंगोले,मीनाक्षी येडगे,शोभा फुले,सुरेखा पवार,शोभा पाटील,स्वाती गावडे,सुप्रिया माने,स्नेहा कुमठेकर,अलका कोळेकर, कुसुम जानकर,अंजू माने,सीमा कांबळे,डॉ.मेघना देवकते,अर्चना शिंदे,नीलिमा शिंदे,भिंगे मॅडम,छाया पाटील,कोमल कांबळे,शोभा माळी,मंगल बनसोडे, राजश्री जाधव,शोभा खडतरे,ताई ढेरे,लता बनकर, मंगल चौगुले,जयश्री पाटील,चंद्रप्रभा माने,सुनीता लिगाडे,दीप्ती कुलकर्णी,कोमल भंडारे,योगिता तरकसबंद,अश्विनी दौंडे,माधुरी जाधव,स्वाती चव्हाण, श्रद्धा देशमुख,इंदिरा येडगे,गीता दौंडे,सुजाता दौंडे, रुपाली मदने,उषा देशमुख,जया नायकुडे,कविता रेड्डी,पिंकू मदने,सविता लोखंडे,सविता बनसोडे,रतन बनसोडे,कोमल सुरवसे,जरीना मोगल यांच्यासह असंख्य महिला परिश्रम घेत आहेत.
——————————————————————————