आम.शहाजीबापूंसारखे कणखर नेतृत्व विधानसभेत पाठवा – नाम.रामदास आठवले
आम.शहाजीबापूंच्या प्रचारार्थ सांगोला येथील जाहीर सभेला उस्फूर्त प्रतिसाद
सांगोला :
राज्यात महायुती सरकारने चांगल्या प्रकारे कार्य केले असून महायुती सरकारच्या काळात अनेक योजना मार्गी लागल्या.समाजातील प्रत्येक घटकाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यात दलीत समाजाचा सर्व प्रकारचा निधी खर्च करुन समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे.बापूंनी दलीत समाजासाठी तब्बल १०० कोटींचा निधी खर्च करुन समाजाचा विकास साधला असून आ.शहाजीबापू पाटील यांच्यासारखे कणखर नेतृत्व विधानसभेत पाठवा,असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नाम. रामदास आठवले यांनी सांगोला येथील जाहीर सभेत केले.
सांगोला शहरातील मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी महायुतीचे उमेदवार आ.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये नाम.रामदास आठवले हे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार शहाजीबापू पाटील यांचेसह आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे,सुनील सर्वगोड,भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख,भाजपच्या नेत्या राजश्रीताई नागणे-पाटील,तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर,माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, शिवसेनेचे नेते विजय शिंदे,दलित समाजाचे सोलापूर व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने,मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष दीपक ऐवळे,राजू गुळीग,रामस्वरुप बनसोडे,कीर्तीपाल बनसोडे,दामोदर साठे,भाजपच्या सोलापूर जिल्हाउपाध्यक्षा शितल लादे,जिल्हाचिटणीस संगीता चौगुले,विधानसभा समन्वयक वैजयंती देशपांडे,शहराध्यक्षा मनीषा देशपांडे,रुकसाना मुजावर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाम.रामदास आठवले पुढे म्हणाले की,दलीत पॅंथरच्या चळवळीपासून आमदार शहाजीबापू पाटील व माझी मैत्री आहे.शहाजीबापूंनी तालुक्याच्या प्रत्येक गावात विकास केला आहे.दलीत समाजासाठी त्यांनी मोठी मदत केली आहे.मी कधी येणार ? याची तुम्ही वाट पाहत होता.परंतु,मी बापू कधी आमदार होतील ? याची वाट पहातोय.आमदार शहाजीबापू हे एक धाडसी नेतृत्व आहे.ते पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये होते.परंतु, राज्याच्या राजकारणात मोठी क्रांती करुन शहाजीबापू पाटील हे महायुतीचे नेते बनले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने राज्यात विकासाभिमुख कार्य करुन लोकप्रियता मिळवली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार हे काँग्रेससोबत गेले.परंतु,काँग्रेसने शरद पवारांना प्रधानमंत्री होण्यापासून रोखले.भाजप सरकार संविधान बदलेल,अशी भीती राहुल गांधी घालतात.मी नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात असल्याने संविधान बदलायची कोणाच्या बापाची हिंमत नाही. संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर, माझा समाज त्याला टराटरा फाडून टाकेल.खोटा प्रचार करुन समाज फोडण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे.सांगोला तालुक्यातून शहाजीबापूंना निवडून आणण्यासाठी मी आलो असून महायुतीला राज्यात चांगला प्रतिसाद आहे.तालुक्यातून आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे,असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले.
यावेळी,आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे,शिवसेना नेते विजय शिंदे,आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,आ.शहाजीबापूंनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास साधला असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी २ कोटी रुपये निधी खर्च केला.तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तसेच महायुती सरकारने दिलेल्या निधीतून कोट्यावधी रुपयांची कामे केली. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.यावेळी सर्वांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहू,असे ठामपणे सांगितले.
——————————————————————————
भविष्यात,दलीत समाजासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी आणणार :
गेल्या ३५ वर्षात मी चळवळ उभी केली.चळवळीच्या माध्यमातून मला तालुक्याचा विकास करुन दुष्काळावर मात करता आली.येत्या वर्षभरात सांगोला तालुक्यात हरितक्रांती झालेली पहायला मिळेल. महायुती सरकारने सांगोला तालुक्यासाठी ५ हजार कोटीहून अधिक निधी दिला. मी दलित समाजासाठी १०० कोटीहून अधिक निधी खर्च केला आहे.५ वर्षाच्या कालखंडात तालुका सुरक्षित ठेवला असून तालुक्यातील सर्व समाजाला निधी देऊन विकासाच्या प्रवाहाच्या दिशेने घेऊन जात आहे.तालुक्यात शंभर कोटी रुपये निधी आणून भविष्यात मागासवर्गीय समाजासाठी आदर्श असे वसतीगृह करण्याचा संकल्प आहे.महूद गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचे चांगले कार्य मी केले आहे.या निवडणुकीत निवडून देऊन ५ वर्ष काम करण्याची संधी द्यावी.यापुढे, दलीत समाजासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी आणून समाजाचा परिपूर्ण विकास करण्यास कटीबद्ध आहे.
– आम.शहाजीबापू पाटील