ॲड.शहाजीबापूंच्या प्रचारार्थ सांगोल्यात गोविंदाची जाहीर सभा
सांगोला :
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सुप्रसिध्द सिने अभिनेता गोविंदा गुरुवारी सांगोला शहरात येणार असून गोविंदाच्या उपस्थितीत सांगोल्यात भव्य रोड शो व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ प्रसिध्द सिने अभिनेता गोविंदा गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सांगोल्यात येणार असून जाहीर सभेपूर्वी रोड शो होणार आहे.
—————————————————————————
* रोड शो चा मार्ग *
प्रारंभी,अंबिका मंदिर येथे नारळ फोडून (रोड शो) रॅलीला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयासमोरुन कचेरी रोडमार्गे अण्णाभाऊ साठे चौक,जयभवानी चौक, नगरपरिषदेसमोरुन नेहरु चौक आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचे रुपांतर जाहीर सभेत होणार आहे.