सांगोला :
सांगोला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ.शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यात शिवसेना (शिंदे गट),भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट),रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती असून सांगोला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सांगोला शहरातील वासूद रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल शेजारील पटांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या जाहीर सभेद्वारे सांगोला विधानसभा मतदार संघातील मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी,या सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील तसेच भाळवणी गटातील महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————
More Stories
सांगोला राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० कि.मी.खुल्या गटात युपीचा मनुकुमार प्रथम
सांगोला नगरपालिकेकडून मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास मार्गावर डेकोरेटिव्ह लाईट उभारणी
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणीचिंचाळे-भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर