आम.शहाजीबापूनी डोंगराएवढी प्रचंड कामे केल्याने मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित – खासदार श्रीकांत शिंदे
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी ५ हजार कोटीहून अधिक निधी दिला – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला :
सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी झालेली ही प्रचंड गर्दी म्हणजेच त्यांनी केलेल्या विकासकामांची पोहोच पावतीच असून शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवला आणि तालुक्याचा दुष्काळ हटवला. महायुती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी ५ हजार कोटीहून अधिक निधी देऊन मोलाचे योगदान दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची, योजनांची व विकास कामासाठी दिलेल्या निधीची तुलना करुन जनतेने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणावे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात डोंगराएवढी प्रचंड कामे केल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी महुद येथील प्रचारसभेत व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचे प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील महूद बु॥ येथे मंगळवारी सकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव संजय मशिलकर,भाजपाचे किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख,माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार,जेष्ठ नेते शिवाजीअण्णा गायकवाड,राजश्रीताई नागणे-पाटील,राणीताई माने,छायाताई मेटकरी,मुबीना मुलाणी,रुकसाना मुजावर,सागर दादा पाटील,दिग्विजयदादा पाटील, अभिजीत नलवडे,रविराज शिंदे,अरुण बिले,राजू कोळी,भारत चव्हाण,सचिन गायकवाड,महेश साठे, ओंकार लवटे,शिवाजी दिघे,पिंटू इंगोले,डॉ.विजय बाबर,माऊली तेली,अस्मिर तांबोळी,दुर्योधन हिप्परकर, रामचंद्र ढोबळे,गुंडादादा खटकाळे,अच्युत फुले,दगडू बाबर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा.श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, महायुती सरकारने सव्वा दोन वर्षाच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना अंमलात आणल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “शासन आपल्या दारी” सारख्या योजना राबवण्यासाठी रात्रंदिवस काम केले.टेंभू,म्हैसाळ, उजनी,जीहे-कटापूर आदी पाणी सिंचनाच्या योजनांचे पाणी चालू केले.शेतकऱ्यांचे वीजबील माफ केले. तालुक्यातील पीक जळीतांसाठी महायुती सरकारने १६६ कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला.केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला.तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जे अडीच वर्षात जमले नाही ते,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वादोन वर्षात करुन दाखवले. यासाठी काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते.एक रिक्षा चालक,एका शेतकरी कुटुंबातील मुलगा राज्याचा मुख्यमंत्री बनून राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो,हे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय.मुख्यमंत्र्यांना गरीबीविषयी जाणीव असल्याने त्यांनी गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या.”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सर्वसामान्य कुटुंबाला वरदान ठरणारीआहे.मुख्यमंत्री सहायता निधीमधून हजारो कुटुंबांना वैद्यकीय खर्चासाठी मदत केली. त्यामुळे,महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असून शहाजीबापूंना विक्रमी मतांनी निवडून द्या.शहाजीबापू पाटील यांना राज्यात मंत्रिपदाची संधी देऊ,असे आश्वासन यावेळी खा.श्रीकांत शिंदे यांनी दिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड.महादेव कांबळे,आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक दिघे,विद्यार्थी सेनेचे अजिंक्य शिंदे,दत्ताराव नागणे,भीमशक्ती संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बनसोडे,होलार समाजाचे नेते दीपक ऐवळे,रामचंद्र ढोबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रत्येकांनी आपल्या मनोगतात महायुती शासनाने राज्यात व तालुक्यात केलेल्या विकास कामांची माहिती देत आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून येऊन भविष्यात नामदार झाल्यावर तालुक्याचा शंभर टक्के विकास पूर्ण होईल.सांगोला तालुक्यातील तरुणांच्या,शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील.तसेच पाण्याच्या सर्व योजना मार्गी लागून तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल व तालुक्यात हरितक्रांती होईल.तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी मोठ्या एमआयडीसीची व औद्योगिकरणाची गरज आहे,ती शंभरटक्के पूर्ण होणार आहे.
——————————————————————
मतदारांनी रात्रीचा दिवस करावा व मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे :
सांगोला तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी शेतकरी,गोरगरीब व सर्वसामान्यांना दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी स्व.आम. गणपतराव देशमुख यांच्या विरोधात सुमारे ७ विधानसभा निवडणूका लढवल्या.तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून भविष्यात मोठी एमआयडीसी आणून बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित विकासकामे पूर्ण करायची आहेत.ज्या गावात दीपकआबांचा जन्म झाला, ते गावही त्यांना म्हैसाळ योजनेत बसवता आले नाही,हे कामही मलाच करावे लागले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तालुक्यावर खूप मोठे उपकार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यासाठी ५ हजार कोटीहून अधिक निधी देऊन तालुक्याच्या विकासाकरिता चांगली भूमिका बजावली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे जमले नाही ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवले. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” अंमलात आणून महिलांना प्रति महिना १ हजार ५०० रुपये देऊन महिलांचा सन्मान केला,पण विरोधकांना पाहवत नाही.राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी व मला मंत्री पदाची संधी देण्यासाठी मतदारांनी रात्रीचा दिवस करावा व मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. – आमदार शहाजीबापू पाटील
——————————————————————————
तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी केला प्रवेश :
सर्वप्रथम स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन खा.श्रीकांत शिंदे व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सभेसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते,युवा वर्ग व मतदार बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोठ्या जल्लोषात खास.श्रीकांत शिंदे व आमदार शहाजीबापू पाटील यांचे स्वागत करण्यात आले.मोठ्या धाडसाने निवडणुकीला सामोरे जाऊन प्रत्येकाने आपल्या कौशल्यावरती आपल्यासोबत १० मतदारांसह शहाजीबापूंना मतदान देऊन सहकार्य करा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते व सांगोला शहरातील भीमनगर येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे व आमदार शहाजीबापू यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.