सोलापूर

सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 

सोलापूर :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्टेशन चौकातील पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तर,भारताचे माजी पंतप्रधान स्वातंत्र्यसेनानी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कॉंग्रेस भवन,सोलापूर येथे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे,माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, हाजी तौफिक हत्तुरे,आरिफ शेख,विनोद भोसले, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, अंबादास गुत्तीकोंडा, नागनाथ कदम,ए.डी.चिनीवार, विश्वनाथ साबळे, भीमाशंकर टेकाळे, अंबादास बाबा करगुळे, पशुपती माशाळ, राजन कामत, अनिल मस्के, शकील मौलवी, तिरुपती परकीपंडला, आप्पासाहेब बगले, सिद्धाराम चाकोते, नासिर खान, चक्रपाणी गज्जम, रुस्तुम कंपली, नुरअहमद नालवार, हाजी मेनुद्दीन शेख, सहदेव ईप्पलपल्ली, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, मधुकर आठवले, उपेंद्र ठाकर, संजय गायकवाड, रफिक चकोले, सुनील व्हटकर, दाऊद नदाफ,व्ही.डी.गायकवाड, मेघश्याम गौडा, विनोद गायकवाड, शिवानंद अंजनाळकर, सुभाष वाघमारे, हरीश गायकवाड, दत्तात्रय नामकर, पुरुषोत्तम बलदवा, नागनाथ शावणे, वसिष्ठ सोनकांबळे, सलीम मनुरे, धीरज खंदारे, श्रीकांत दासरी, शकुर शेख, अनीता भालेराव, मुमताज तांबोळी,जयप्रकाश पल्ली,शोभा बोबे, कमरुनिस्सा बागवान, लतीफ शेख,चंदा काळे,स्नेहल शिंदे,रुकैया बिराजदार, अंजली गुळेकर, सोपान खांडेकर, पूजा नुल्लूलवार, रमेश फुले,सौरभ साळुंखे,विकास येळेगावकर, हाजी मेहमूद शेख,नरसिंह आयगोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button