मला विजयी करा,नामदार म्हणूनच तालुक्यात परत येईन – आमदार शहाजीबापू पाटील

भव्य मोटरसायकल रॅलीसह शक्तीप्रदर्शन करत महायुतीच्या वतीने शहाजीबापूंचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगोला :

उद्याची विधानसभा निवडणूक ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे.तालुक्यातील प्रत्येक घरातील व्यक्ती समृध्द करण्याचे माझे ध्येय आहे.सांगोला तालुका हिरवागार होईपर्यंत हा शहाजीबापू स्वस्थ बसणार नाही.सांगोला तालुक्यातील एक गांवही पाण्यापासून वंचित राहणार नाही,याची दक्षता घेतली आहे. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी मला विजयी करावे,मी तालुक्यात नामदार म्हणूनच परत येईन,असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत व्यक्त केला.

                             सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ.शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर मतदार बंधू-भगिनींचे आशीर्वाद घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक,शिवतीर्थ येथे सभा घेण्यात आली. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील हे बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, मी यापूर्वी ७ विधानसभा निवडणुका स्व.आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात लढविल्या. विधानसभेची ही आठवी निवडणूक नवख्या उमेदवाराविरुद्ध लढवत आहे.विरोधकांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी घ्या,ही लढाई विकासासाठी आहे. तालुक्यात मतदारांमध्ये विष पेरायचे काम कोणीही करु नये. तालुक्यात युवकांची मोठी ताकद असून मी केलेल्या विकास कामावर जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे कोणी कांहींही केले तरी विजयाचा गुलाल हा माझाच आहे,असा ठाम विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी मतदार बंधू-भगिनींसमोर व्यक्त केला.

                   यावेळी माजी पं.स.सदस्य सुभाष इंगवले, माजी नगराध्यक्षा राणीताई माने,तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख,जेष्ठ नेते शिवाजीअण्णा गायकवाड,शंकर दुधाळ,डॉ.विजय बाबर,माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार,ॲड.बंडू काशीद, धोंडीराम घोलप,दीपक ऐवळे,शिवाजीनाना पवार, धनाजी पवार,धनंजय चव्हाण,विकास वलेकर,श्रीकांत पाटील आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की,राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी देण्यासाठी व तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील यांना विजयी करुन नामदार करण्यासाठी ही २०२४ सालातील विधानसभा निवडणूक चुरशीची ठरणार आहे.यामध्ये मतदार बंधू-भगिनींनी गाफिल न राहता, बापूंच्या कार्यकर्तृत्वावर व केलेल्या कामावर खुश होऊन मोठ्या मनाने बापूंना भरघोस मतांची आघाडी देऊया.सांगोला तालुक्यात महायुतीची जागा निवडून आणायची आहे.बापूंना मंत्रिपद मिळणार आहे. राज्यातील इतर कोणत्याही तालुक्यात सांगोला तालुक्याइतका विकास निधी आला नाही,हे श्रेय बापूंचे आहे.हे आपण आनंदाने मान्य करुन बापूंची इच्छा,आकांक्षा पूर्ण करुया. आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात ५ हजार ५०० कोटी रुपयांचा विकास निधी आणून प्रत्येक गावामध्ये विकास घडवून आणला आहे.भाळवणी गटातून १० हजार मतांची आघाडी देऊ,असा विश्वास धोंडीराम घोलप यांनी यावेळी व्यक्त केला.

         सदर सभेसाठी युवासेना जिल्हाप्रमुख सागरदादा पाटील,युवा नेते दिग्विजयदादा पाटील,भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने,अस्मिर तांबोळी व माऊली तेली, कीर्तीपाल बनसोडे,उद्योगपती आनंद घोंगडे,अरुण बिले,अच्युत फुले,विजयदादा शिंदे,समीर पाटील , जगदीश पाटील,गुंडादादा खटकाळे,धनंजय काळे, अभिजीत नलवडे,रविराज शिंदे,बाळासाहेब आसबे, भारत चव्हाण,अजिंक्य शिंदे,समाधान सावंत,सोमेश्वर यावलकर,अय्युब मुलाणी,दीपक दिघे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेना,भारतीय जनता पार्टी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,रयतक्रांती संघटना या पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,मान्यवर व मतदार बंधू-भगिनी तसेच युवक मोठ्या संख्येने         पस्थित होते.

             ——————————————————————

आ.शहाजीबापूंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य मोटरसायकल रॅली संपन्न :

महायुतीचे उमेदवार आ. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर व कार्यावर विश्वास ठेवून सांगोला शहर व तालुक्यातील अनेकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला.  प्रवेश केलेल्या मान्यवरांमध्ये फिरोज खाटीक,भाऊसाहेब नवले,अल्ताफ मुलाणी, सद्दाम मुलाणी,बशीर मुलाणी,हणमंत येलपले, विनायक पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश करुन आमदार शहाजीबापू पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी योगदान देण्याचे जाहीर केले.आ.शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जनसमुदायाची भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी सभा घेण्यात आली व जनसमुदायाचा आशीर्वाद घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालय येथे दाखल केला.यावेळी तालुक्यातून प्रचंड जनसमुदाय,बंधू-भगिनी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती :

          आमदार शहाजी बापू पाटील यांचा महायुतीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांचेसह ॲड.उदयबापू घोंगडे,भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे हे मान्यवर उपस्थित होते.