सांगोला :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सांगोला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड.शहाजीबापू राजाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोटार सायकल रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी दिली आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ॲड.शहाजीबापू राजाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोटरसायकल रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी,सदर मोटरसायकल रॅलीसाठी व सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी,युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.
——————————————————————————
रॅलीचा मार्ग व सभा :
-
सदर रॅलीला सांगोला शहरातील एखतपूर रोडवरील ब्रिजपासून सुरुवात होऊन अंबिकादेवी मंदिर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक,वाढेगाव नाका, कडलास नाका,वासुद चौक, महात्मा फुले चौक व नेहरु चौक येथे ही रॅली संपल्यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक